विविध मागण्यांसाठी ग्रामसेवकांचे तीन दिवशीय कामबंद आंदोलन

गोंदिया : आपल्या विविध मागण्यांना घेऊन ग्रामसेवकांचे १८ ते २० डिसेंबर या तीन दिवशी कामबंद आंदोलन पुकारले आहे. आंदोलनाच्या दुस?्या दिवशी गोंदिया जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात जुनी पेंशन योजना लागू करण्याची मागणी ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कमलेश बिसेन यांनी केली आहे. महाराष्ट्रात प्रथमच ग्रामपंचायत स्तरावर काम करणा?्या सर्व कर्मचारी संघटना यामध्ये ग्रामसेवक युनियन, अखिल भारतीय सरपंच परिषद ग्रामपंचायत सदस्य, संगणक परिचालक संघटना, ग्रामपंचायत कर्मचारी संघटना व ग्रामरोजगार सेवक संघटना यांनी एकत्रीतरित्या विविध प्रलंबीत न्याय मागण्यांसाठी शासनाचे लक्षवेध करण्याकरीता १८ ते २० डिसेंबर या तीन दिवसांचे कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या कालावधीत कामबंद आंदोलन करुन जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती कार्यालयांसमोर एक दिवस सर्व संघटनांचे वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. न्याय हक्कांसाठी ग्रामपंचायत स्तरावर ग्रामविकासाचा महत्वाचा घटक असूनही ग्रामपातळीवर काम करणा?्या कर्मचा?्यांच्या न्याय मागण्या प्रलंबीत आहेत. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्षकमलेश बिसेन, सचिव कुलदीप कापगते, उपाध्यक्ष सचिन कुथे, भारती वाघमारे, शैलेश परिहार, योगेश रूद्रकार, योगराज बिसेन, रजनी शहारे, रामेश्वर जमईवार, रितेश शहारे, सुरेश वाघमारे, टिकाराम जनबंधू, प्रदीप ठाकरे, किशोर आचले, नरेंद्र गोमासे, नम्रता रंगारी यांनी केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.