संभाजीनगरच्या रंगमंचावर गाजली वाहक-चालकांची ‘नजर’

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आयोजित ५१ व्या आंतर विभागीय नाट्य स्पर्धा यशवंतराव चव्हाण नाट्यगृह छत्रपती संभाजी नगर येथे आयोजित करण्यात आले होते. सदर स्पर्धेमध्ये भंडारा विभागातील नाट्य कला प्रेमींनी दोन अंकी नाट्यपुष्प संगीत ‘नजर’ चे सादरीकरण केले. विभागाचे विभाग नियंत्रक तनुजा अहिरकर, यंत्र अभियंता (चा) महेंद्र नेवारे, संघ व्यवस्थापक पराग शंभरकर, कामगार अधिकारी राज्य परिवहन भंडारा, ‘नजर’ चे लेखक निर्माता दिग्दर्शक प्रा. शितल दोडके, सह दिग्दर्शक सुरेंद्र उके यांचे मार्गदर्शन तथा सहकार्य लाभले. आजच्या विज्ञान युगात बालिका पासून तर मोठ्या महिलेपर्यंत स्त्रि कितपत सुरक्षित आहे यांचे जिवंत सादरिकरण म्हणजे ‘नजर’ नाट्यपुष्प. एक मुलगी ७८ वर्षाची अंगणात खेळत असतांना एका व्हाय्यात माणसाची नजर तिच्यावर जाते. तो तिला चॉकलेटचं आमिष दाखवून तिच्यावर क्रूरकर्म करतो, तिच्या भावनेचा तसेच वयाचाही विचार करित नाही. असाच स्वयंघोषित बाबा लोकांना (भक्तांना) विश्वासात घेऊन असंख्य महिलांवर अत्याचार करतो, नंतर त्याचा भंडाफोड होतो. एक महिला पत्रकार त्याचं सत्य समाजासमोर आणते, शेवटी तिही मारल्या जाते. अशिच एक घटना कॉलेजात शिकणाºया मुलिंची. एक मुलगा तिच्याशी मैत्री करतो, ति त्याला चांगला मित्र समझायला लागते. हळू-हळू तो तिला प्रपोज करतो, ति त्याला समजावून सांगते की, मी इथे शिकायला आली, मला माझं करिअर घडवायचं आहे, माज्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आहेत.

मला माझा करिअर बनवायचा आहे. मी तुला मित्र मानते, मित्रच राहा. तरिही तो ऐकत नाही, त्याच्या डोक्यात वासनांध किडे वळवळायला लागतात. शेवटी तिच्या तोंडावर अ‍ॅसिड फेकूण तिला विद्रुप करतो. अश्या कितीतरी समस्या ‘नजर’ ह्या नाटकाच्या माध्यमातून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. ‘नजर’ चांगली का वाईट हे आपल्या विचारांवर अवलंबून असते. डोक्यात चांगले विचार आणले तर नजर चांगली, डोक्यात वाईट विचार आणले तर नजर वाईट. मग ति नजर तिरपी असो वा सरळ, अश्या वास्तववादी प्रश्नांना वाचा फोडणारे नाटक म्हणजे ‘नजर’. नजर या दोन अंकी नाटकातील भुमिका करणारे कलावंतांमध्ये बाली तथा शालेय मुलीच्या भूमिकेत कु.कोमल ना.उईके ( वाहक तिरोडा), अंकलच्या भूमिकेत बाळकृष्ण विजाराम मलगाम (चालक गोंदिया), “ती” च्या भूमिकेत हेमाक्षी भाऊजी डोहे (वाहक गोंदिया), स्वयंघोषित बाबा च्या भूमिकेत सुरेश विठ्ठल हलमारे (चालक भंडारा), रिपोर्टर पल्लवी च्या भूमिकेत दिपलता शालीकराम कडुकार (वाहक गोंदिया), कॅमेरामन शैलेश च्या भूमिकेत विलास कारूजी मेश्राम (वाहक भंडारा), राघवच्या भूमिकेत प्रणव ऊ. रायपुरकर (चालक भंडारा), संघर्ष च्याभूमिकेत सुकराम ग्या. मलेवार (चालक भंडारा), प्राची च्या भूमिकेत जिजा मनोज पगाडे (सहाय्यक भंडारा), काका च्या भूमिकेत पुरण मंगरू पडारे (वाहतूक निरीक्षक तुमसर), चंदू च्या भूमिकेत अमोल आत्माराम गभणे (चालक/वाहक तुमसर), हरीश च्या भूमिकेत राजेंद्र डी. भुते (चालक तथा वाहक भंडारा),

पोलीस एकच्या भूमिकेत पंकज दिलीप वानखेडे (यांत्रिक कर्मचारी विभागीय कार्यशाळा), पोलिस दोन च्या भूमिकेत सुरेश परसराम शेंडे (वाहक भंडारा), पुजारी च्या भूमिकेत सुनिल गजभिये (लिपिक भंडारा), संजु च्या भूमिकेत सोहन मेश्राम (वाहक भंडारा), आई च्या भूमिकेत सौ. भाग्यश्री अश्विन गभणे (सहाय्यक कारागीर भंडारा), भक्तगण एक च्या भूमिकेत महेंद्र अशोक मोरे भंडारा यांनी नाटकातील भुमिका / पात्र रंगमंचावर सादर केले. भंडारा विभागातील राज्य परिवहन अधिकारी तथा कर्मचाºयांनी नजर नाटकातील नाट्य स्पर्धकांचा अभिनंदन करून गौरव केला व पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *