गोसेच्या जलपर्यटन क्रांतीचे पहिले पाऊल

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्रात नवी क्रांती घडविण्याच्या दृष्टीने आज पहिले पाऊल टाकण्यात आले. गोसीखुर्द प्रकल्पाच्या पर्यटन विकासाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबई येथे मंत्रालयात १०२ कोटीच्या पहिल्या टप्प्या अंतर्गत गोसेच्या आवश्यक ४५० एकर जागेसाठी पर्यटन विभाग आणि जल संपदा विभाग यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या अत्यंत महत्वाच्या क्षणी राज्याचे उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा व आ. नरेंद्र भोंडेकर यांच्या समक्ष करारावर स्वाक्षºया करण्यात आल्या. परिणामी आता या प्रकल्प भूमिपूजनाचा लवकरच मुहूर्त निघेल, तेवढेच खरे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भंडारा दौºयात गोसे धरणाला भेट दिली होती. या भेटी नंतर त्यांनी पर्यटन विभागात असलेल्या गोसे जल पर्यटनाच्या प्रस्तावाला तत्काळ मंजुरी प्रदान करण्याची घोषणा केली होती आणि आपले वचन पूर्ण करीत काही दिवसातच या प्रकल्पाला हिरवी झेंडी प्रदान करून, या करिता २५० कोटी पैकी पहिला टप्पा म्हणून १०२ कोटी रुपयांना मंजुरी प्रदान केली होती.
आज या गोसे जल पर्यटना ने एक पाऊल पुढे टाकले आहे. पर्यटन प्रकल्प विकासासाठी लागणारी जल संपदा विभागाच्या ४५० एकर जागेच्या अनुषंगाने पर्यटन विभाग आणि जल संपदा विभागात सामंजस्य करार करण्यात आला. यामुळे आता गोसे जल पर्यटनाच्या कामाला चालना मिळणार असून या पर्यटना मुळे जिल्ह्यातील शेकडो हातांना रोजगार मिळणार आहे. सदर जलपर्यटनाची प्रक्रियेच्या अनुषंगाने काही बाबी येत्या जून महिन्या पर्यंत पूर्ण करण्यातयेणार असून याच वर्षी आॅक्टोबर महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे आ. भोंडेकर यांनी सांगितले. या सामंजस्य कराराद्वारे विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला जागतिक दर्जाचे जलपर्यटन स्थळ विकसित, व्यवस्थापित आणि चालविण्यास परवानगी दिली जाईल आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ या प्रकल्पामध्ये स्थानिक तरुणांसाठी ८० टक्के रोजगार देईल, असे निश्चित आहे.
पर्यावरणास अनुकूल आणि शाश्वत पद्धतीने जलपर्यटन होणार आहे. हा सामंजस्य करार जलीय पर्यटनाद्वारे शाश्वत विकासासाठी ताज्या पाण्याच्या स्त्रोतांचा वापर करण्याच्या दिशेने सुद्धा एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे आणि राज्याच्या दुर्गम भागातील स्थानिक समुदायांच्या सामाजिक-आर्थिक उन्नतीसाठी योगदान देणारा आहे. हा करार करताना उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, आ. नरेंद्र भोंडेकर, माजी वि.प. सदस्य परिणय फुके, जल संपदा विभागाचे अप्पर सचिव दीपक कुमार, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, विदर्भ पाटबंधारे विभागाचे विभागीय कार्यकारी संचालक राजेंद्र मोहिते, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी, कार्यकारी उपसंचालक शीप्रा बोहरा, प्रोजेक्ट को ओर्डीनेटर सारंग कुलकर्णी व इतर अधिकारी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *