बांधकाम सभापतींपुढे नागरिकांनी वाचला समस्यांचा पाढा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : क्षेत्रातील नागरिकांना येत असलेल्या अडचणी व त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी येथील जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती संजय टेंभरे यांनी आज ३० मार्च रोजी फुलचुर जिल्हा परिषद क्षेत्रातील फुलचुर व फुलचुर टोला येथे भेटी दिल्या असता नागरिकांनी विविध समस्यांचा पाढा वाचला. प्रसंगी टेंभरे यांनी जनतेच्या समस्या ऐकून त्यांचे निराकरण करण्याची ग्वाही दिली. फुलचुर जिल्हा परिषद क्षेत्रातील फुलचुर व फुलचुर टोला गावे शहराला लागून आहेत. येथे अनेक नागरी समस्या आवासून उभ्या आहेत. येथे सर्वसामान्यांसह नोकरदार, व्यापारी वर्ग वास्तव्यास आहेत. या निमशहरी भागात हव्या त्या सुविधा नसल्याने अनेक समस्या उद्भवतात.
स्थानिक ग्रामपंचायत प्रश- ासनानेही नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले आहे. परिणामी येथील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. नागरिकांना होत असलेल्या समस्या जाणून घेण्यासाठी आज संजय टेंभरे यांनी फुलचुर व फुलचुर टोला भागातील अनेक ठिकाणी भेटी देऊन समस्या जाणून घेतल्या. फुलचुर टोला येथील साई माऊली कॉलनी येथील नागरिकांनी सांडपाणी व्यवस्थापन, रस्ते, पूल, नाल्या याबाबत समस्यांचा सांगीतल्या. टेंभरे यांनी समस्या जाणून घेत लगेच ग्रामपंचायत व संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांना तत्काळ समस्या निवारणासंदर्भात सूचना दिल्या.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *