श्रीराम मंदिरात रामजन्माचा सोहळा साजरा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : श्रीराम नवमीचे औचित्य साधून खांबतलाव परिसरातील श्रीराम मंदिरात रामजन्माचा सोहळा पार पडला. यावेळी नगरजन मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीराम मंदिरात गुढीपाडवा ते रामनवमी पर्यंत नियमित रामरक्षा आणि हनुमान चालीसा पठाण केले गेले. रोज संध्याकाळी या उपासनेसाठी अनेकजण उपस्थित राहत होते. आज ३० रोजी सकाळी १० दुपारी १२ वाजता प्रभू श्रीरामाचा जन्म झाला. यावेळी सजवलेल्या पाळण्यात एका छोटया बाळाला टाकून हा जन्मोत्सव साजरा केला गेला. प्रसंगी गुलाल आणि फुलांच्या पाकळ्यांची उधळण करण्यात आली.
जन्मोत्सव सोहळ्याला नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. श्रीराम जन्मानंतर महाप्रसाद वितरण करण्यात आले. संध्याकाळी याच मंदिर मंदिरातील उत्सव मूर्तीची नगरातून शोभायात्रा काढण्यात आली. वाजता गणू महाराज चेपे यांच्या श्रीराम जन्मावरील कीर्तनाला सुरुवात झाली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *