लागले विजेचे खांब

भंडारा पत्रिका/वार्ताहर गोबरवाही : शुक्रवार दि. ७ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास आलेल्या वादळ व अवकाळी पावसामुळे शेतात व महादेव देवस्थानकडे जाणाºया मार्गावरील ट्रान्सफॉर्मर क्रमांक ३ कोसळला. धुतेरा गावात विजेचा खांब पायापासून तुटला आणि खांब हवेत डोलायला लागला. खांबाच्या ताराही जमिनीच्या दिशेने वाकल्या, ही घटना गावातील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते सौरभ बेलखेडे यांच्या शेताजवळ घडली. या घटनेची माहिती तातडीने वीज वितरण कंपनीला तसेच कर्मचारी व अभियंता यांना दिली. वीज वितरण कंपनीने या लाईनचा वीज पुरवठा बंद केला. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेमुळे वीजपुरवठा खंडित झाला.
शनिवारी सकाळपासून रात्री आणि दिवसभरात सुमारे बावीस तास गावात विद्युत बंद होती, वीज कंपनीनेच सुधारणेचे काम सुरू केले. सौरभच्या तत्परतेने व माहिती दिल्यामुळे तीन वाजल्यापासून धुतेरा गावात वीजपुरवठा सुरू झाला. त्या ठिकाणी वीज कंपनीने नवीन पोल बसवले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *