गरजवंत नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ द्या-समीर मस्के

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : ज्या नागरिकांकडे निवा-याची अजिबात व्यवस्था नाही. तसेच ज्या नागरिकांचे घर, झोपडी वादळ वा-यात, अतिवृष्टीत पडली असेल अशा गरजू व गरजवंत नागरिकांना प्रथम प्राधान्याने घरकुल योजनेचा लाभ देण्याची मागणी लाखनी तालुक्यातील कान्हाळगाव ग्रामपंचायतचे सरपंच समीर मस्के यांनी केली आहे. बºयाच गावात काही नागरिकांना राहण्यासाठी निवा-याची व्यवस्था नाही तर काही नागरिकांकडे निवा-याची कशी तरी सोय होती परंतु त्यांचे झोपडी वजा घर वादळ वारा, अतिवृष्टीत कोसळून क्षतिग्रस्त जमीन दोस्त झाले.
त्यामुळे या नागरिकांकडे आता राहण्यासाठी निवा-याची सोय नसल्यामुळे त्यांना उघड्यावर राहावे लागत असून उर्वरीत आयुष्य कसे व्यथित करावे, असा प्रश्न आवासून उभा ठाकला असून यामुळे ते अनेक समस्यांनी ग्रासले आहेत. घरकुल नसलेले आणि वादळ वारा व अतिवृष्टीत घर पडलेले नागरिक समस्याग्रस्त झाले असून त्यांना घरकुलची प्रतीक्षा लागली आहे.

परंतु घरकुलचा लाभ मिळत नसल्याने ते यामुळे चिंतातुर, हतबल, हताश, हवालदिल व वैफल्यग्रस्त झाले आहेत. शासन प्रशासनाच्या संबंधित यंत्रणेने वेळीच दखल घेऊन गांभीर्याने ज्यांना घरकुल नाही आणि ज्यांचे घर, झोपडी वादळ वारा व अतिवृष्टीत पडली असेल अशा गरजू व गरजवंत नागरिकांना प्रथम प्राधान्याने घरकुल योजनेचा लाभ देण्याची तसदी घ्यावी अशी मागणी कान्हाळगाव ग्रामपंचायतचे सरपंच समीर मस्के यांनी केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.