पांदन रस्त्यांचे खडीकरण डांबरीकरण करण्याची मागणी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील लाखनी, साकोली, लाखांदूर, पवनी, भंडारा, मोहाडी व तुमसर या तालुक्यातील गाव निहाय पांदन रस्त्यांची प्रत्यक्ष मोका पाहणी करून सदर सर्व पांदन रस्त्यांचे खडीकरण, डांबरीकरण करण्याची तसदी घ्यावी अशी मागणी भीम शक्ती संघटनेने केली आहे. जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी बांधवांना शेतीची विविध कामे करण्यासाठी पांदन रस्त्यांवरून आवागमन करावे लागते. परंतु सदर बरेच रस्ते कच्चे असल्याने धान उत्पादक शेतकरी बांधवांना शेतावर ये जा करण्यास शारीरिक, मानसिक, भावनिक त्रास सहन करावा लागत असल्याचे सकृतपणे दिसून येत असून पावसाळ्यामध्ये तारांबळ उडत असते.
पांदन रस्त्यांच्या समस्येमुळे शेतीची कामे करण्यास विलंब होत असतो. याप्रकरणीशासन प्रशासनाच्या सबंधित विभागाच्या अधिनस्त यंत्रणेने वेळीच दखल घेऊन एक विशेष बाब म्हणून भंडारा जिल्ह्यातील लाखनी, साकोली, लाखांदूर, पवनी, भंडारा, मोहाडी, तुमसर या तालुक्यातील गाव निहाय पांदन रस्त्यांची प्रत्यक्ष मोका पाहणी करून सदर सर्व पांदन रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरण करून धान उत्पादक शेतकरी बांधवांना तूर्त दिलासा देण्याची तसदी घ्यावी अशी मागणी भीमशक्ती संघटनेचे, जिल्हा अध्यक्ष प्रकाश देशपांडे, मार्गदर्शक मनोज मेश्राम, भागवत दामले, माधव बोरकर, शैलेश वासनिक, नाशिक गणवीर, उमाकांत काणेकर, वाल्मीक वालदे, मोरेश्वर लेंधारे, वनवास बारसागडे,नरेंद्र कांबळे, अरुण ठवरे, आशीर्वाद रामटेके, गंगाधर काणेकर, मच्छिंद्र टेंभूरणे, संदीप बर्वे, नीलकंठ डडमल, बंडू फुलझेले, जयेंद्र मुल, नत्थु सूर्यवंशी, अजित रंगारी, अक्षय खोब्रागडे, प्रतीक्ष कांबळे, हरिदास बोरकर, उमाकांत काणेकर, डॉ विवेक मोटघरे, नितीश काणेकर, दामोधर उके, धनराज तिरपुडे, अरुणा दामले, सुवर्णा हुमने, रूपा लेंधारे, शारदा रंगारी, पुष्पा मुल, वनमाला बोरकर, नूतन देशपांडे, हेमलता लोणारे, सुनंदा भोवते, धम्मशीला बारसागडे, उर्मिला वालकर, माधुरी सुखदेवे, जयश्री मेश्राम, छाया बोरकर, स्विटी मेश्राम, सरिता नंदागवळी, अस्मिता कांबळे, ज्योती मेश्राम, रंजना बारसागडे, वर्षा शेंडे, वच्छला शेंडे, नरेश चव्हाण, मनोज राऊत, अनु गेडाम, प्रीती मोटघरे यांनी केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *