महिला व बालकल्याण समीतीतर्फे प्राविण्यप्राप्त २३ विद्यार्थ्यांचा मोहाडीत गुणगौरव

तालुका प्रतिनिधी मोहाडी : महिला व बालकल्याण समीती नगरपंचायत कार्यालय मोहाडीच्या वतीने बुधवार दि.२१ जून २०२३ ला दुपारी १ वाजता आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे औचित्यसाधून महिला व बालकल्याण सभापती सुमन गणेश मेहर यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी नगरपंचायत हद्दीतील इयत्ता १० वी व १२ वीतील २३ प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मोहाडीच्या नगरपंचायतच्या सभागृहात पार पडला. यावेळी इयत्ता १० वीतून स्व.सुलोचनादेवी पारधी विद्यालयातून आणि कु.शुभांगी अरुण गायधने कुशारी, कु.आराधना अरविंद कारेमोरे आंधळगाव, कृतिका प्रितम डेकाटे. श्री गुरुदेव चिंतामण बिसने विद्यालयातून स्वीटी दयाराम निखारे, संदीप अनिल गायधने. जिल्हा परीषद कनिष्ठ हायस्कूलमधून प्रज्वंता उद्धव शेंडे, संजना मधुकर गभने, निर्मिती दिनेश मारबते. इयत्ता १२ वी सुदामा कनिष्ठ महाविद्यालयातून विज्ञान शाखेची सलोनी कन्हैयालाल बिरणवार तर कला शाखेची सलोनी फागुराव ढबाले.सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयातून विज्ञान शाखेची रुपाली प्रभाकर वैद्य, प्रतिक्षा सुनिल आगाशे, विशाखा कवळू डोरले तर कला शाखेची निकिता कैलास डोबनूके, पायल प्रकाश तीतीरमारे, शिवम अरविंद कस्तुरे. जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयातून इयत्ता बारावी विज्ञान शाखेची छबिता श्रीकांत भोयर, प्रज्वल मुरलीधर धांडे, अस्विन रामदास लिल्हारे,कला शाखेचा हेमंत दिनेश चिंधालोरे महेंद्र रमेश सूर्यवंशी कल्याणी गणपत पुंडे या विद्यार्थ्यांना फाईल आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष छाया डेकाटे हे होते. प्रमुख अतिथी महिला व बालकल्याण सभापती सुमन गणेश मेहर, उपसभापती रेखा मनोहर हेडाऊ, पाणी पुरवठा सभापती देवश्री विजय शहारे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. तर प्रशासकीय अधिकारी गजानन नरवाडे, नगरसेवक सविता विलास साठवणे, वंदना कृष्णा पराते, महेश निमजे यांची प्रामुख्याने हजेरी होती. प्रारंभी भारत माता व सरस्वती मातेच्या छायाचित्राला पुष्पमाला अर्पण करून प्रमुख अतिथीच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक यादवराव कुंभारे आणि दैनिक भंडारा पत्रिकाचे यशवंत थोटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवेंद्र वाघाये, पांडुरंग कापगते, तुलाराम कराडे, सुनिल गायधनी, शिवदास मेश्राम, श्रीकृष्ण ईलमे, हेमंत कोहाड, दिलीप नंदेस्वर, मंगेश गभने, मार्कंड नंदनवार,पलाश मेश्राम, हंसु सोनकुसरे, पल्लवी जामोदकर, यशवंत बालपांडे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून महिला व बालकल्याण सभापती सुमन गणेश मेहर यांनी कार्यक्रमाची रूपरेषाबद्दल माहिती दिली. संचालन पुनम महेंद्र धकाते यांनी केले तर आभार मनिषा गायधने यांनी मानले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.