मुंढरी येथे सेवार्थ दवाखान्याचे उद्घाटन

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : एक जिल्हा परिषद, एक सार्वजनिक दवाखाना उपक्रमांतर्गत डॉ. हेमंत रहांगडाले यांच्या सप्तर्षी सेवा ट्रस्ट च्या वतीने मुंढरी येथे सार्वजनिक दवाखान्याचे उद्घाटन करण्यात आले. ट्रस्टच्या वतीने अनेक लोकोपयोगी उपक्रम राबविले जातात. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांना चांगली सेवा मिळावी म्हणून जिल्हा परिषद निहाय अशा दवाखान्यांची उभारणी डॉ. रहांगडाले यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

मोहाडी तालुक्यातील मुंढरी येथे या दवाखान्याची सुरुवात करण्यात आली. उद््घाटन डॉ. हेमंत रहांगडाले यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी डॉ. हरेंद्र रहांगडाले होते. डॉ. चव्हाण, डॉ. मोहर तेलंग, डॉ. नेहा कुंभारे, डॉ. योगीता लाखडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. या निमित्ताने इंद्राक्षी आय केअर च्यावतीने नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा परिसरातील अनेक गरजूंनी लाभ घेतला.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *