दिवाळीतील चोरी रोखण्याकरिता मोहाडीचे पोलीस सतर्क

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : सायबर गुन्ह्याचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी काय उपाययोजना राबविण्यात येत आहे, सायबर गुन्हा कसा घडतो, सायबर गुन्ह्याचे कोणते प्रकार आहे तसेच दिवाळीत होणाºया चोºया कशा रोखता येतील, याबाबत मोहाडी शहरातील प्रतिष्ठित नागरिकांची सभा मंगळवार दि.११ आॅक्टोबर २०२२ ला सायंकाळी ६ वाजता मोहाडी पोलीस स्टेशनमध्ये ठाणेदार कक्षात घेण्यात आली. मोहाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले. यावेळी मोहाडी नगरपंचायतचे नगराध्यक्ष छाया डेकाटे यांनीही उपस्थित नागरिकांना, पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी दैनिक भंडारा पत्रिकाचे यशवंत थोटे, सिराज शेख, नरेंद्र निमकर, अफरोज पठाण, सुनील गिरीपुंजे, विजय पारधी, दिनेश निमकर, उमाशंकर बारई, उमाशंकर पटले उपस्थित होते. सायबर गुन्ह्याचे प्रमाण वाढत असून ते चिंताजनक आहे. संगणक, मोबाईल, लॅपटॉप व इतर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सायबर गुन्हा केला जात आहे. वाढते प्रमाण रोखण्यासाठी काय उपाययोजना राबविण्यात येत आहे, याबद्दल पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी आयोजित सभेत माहिती दिली.

दिवाळीच्या सुट्ट्यात कुलूपबंद करून घराबाहेर बाहेर पडताना किव्हा बाहेरगावी जाताना आपल्या प्रभागमधील नगरसेवकांना माहिती द्यावी अथवा मोहाडी पोलीस स्टेशनमध्ये येऊन माहिती दिल्यास त्या घरावर पोलीस कर्मचारी पेट्रोलिंग करण्यासाठी सक्षम राहील. मोहाडी शहरात येणाºया रस्त्यावर संबंधित दुकानदारांनी सीसीटीव्ही कॅमेºयाची व्यवस्था करावी. गावात कुठलाही अनोळखी इसम गावात सामान विकण्याच्या बहान्याने आढळल्यास पोलिसांना तात्काळ सुचना देऊन अवगत करावे. सायबर गुन्हा कसा घडतो, सायबर गुन्ह्याचे कोणते प्रकार आहेत. यामध्ये युवक कसे ओढले जातात, याबद्दल माहिती दिली. दिवाळीत चोरीच्या प्रमाणातही वाढ होते. त्याकरिता नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यावी तसेच नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहनही यावेळी पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे व नगराध्यक्ष छाया डेकाटे यांनी उपस्थित नागरिकांना दिली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *