शॉर्ट सर्किटमुळे धानाची तणीस खाक

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी खापा : मोहाडी तालुक्यातील काटेबाम्हणी येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीमुळे शेतशिवारात साठवून ठेवलेली धानाची तणी जळून खाक झाल्याने शेतकºयाचे हजारो रुपयांचे नुकसान झाले असून जनावरांचा चारा जळाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे. भंडारा रामटेक राज्यमहामार्गावरील काटेबाम्हणी हून जाणाºया उच्च दाबाच्या विद्युत डीपी जवळ शॉर्टसर्किट झाल्यामुळे जवळच असलेल्या तणीसच्या ढीगाला आग लागल्याने शेतकºयाचे तीस हजाराचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकºयाचे नाव मदन दाजीबा कुकडे, रा. काटेबाम्हणी असे आहे.

तरी संबंधित विभागाने शेतकºयाला आर्थिक नुकसान देण्याची मागणी काटेबाम्हणी येथील सामाजिक कार्यकर्ता शैलेश कडव यांनी केली आहे. सध्या परिसरामध्ये उन्हाळी धानाची धानमळणी सुरू आहे. त्यातच तापमानामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने शेतकºयांने जनावरांसाठी शेतशिवारात साठवून ठेवलेली धानाची तणीस जळून खाक झाल्याने नुकसानग्रस्त शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे. आता वेळेवर जनावरांचा चारा आणायचा कुठून हा एक प्रश्न त्याच्यासमोर उभा ठाकला आहे. शॉर्टसर्किटमुळे अचानक लागलेल्या आगीमुळे दाजीबा कुकडे हा शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे, हे मात्र विशेष.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *