लाखनी पंचायत समितीची आमसभा ठरली वादळी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी :- येथील पंचायत समितीची आर्थिक वर्ष २०२३-२४ ची आमसभा काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष तथा साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नाना पटोले यांचे अध्यक्षतेखाली बुधवारी(ता.२२) स्वप्नदीप मंगल कार्यालय लाखनी येथे आयोजित करण्यात आली होती. अनेक गावच्या सरपंचांनी प्रश्न, उपप्रश्न विचारून अधिकाºयांना धारेवर धरले तर महिला सरपंच ही मागे नव्हत्या. मग्रारोहयो तांत्रिक अधिकाºयांवर सर्वाधिक आरोप झाले. त्यामुळे भोवळ येऊन तांत्रिक अधिकारी यशवंत शेंडे खाली पडले होते. ही आमसभा वादळी ठरण्याची चिन्ह दिसत असले तरी सभाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी बाजू सावरली. आमसभा रात्री १०:०० वाजता पर्यंत चालली.

भाजपा चे जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य अनुपस्थित असल्याने चचेर्चा विषय झाला आहे. आर्थिक वर्ष २०२२२३ मध्ये झालेल्या विविध विकास योजनांचा आढावा व २०२३-२४ मध्ये करावयाच्या विकास योजनाबाबद चर्चा करण्यासाठी पंचायत समिती कार्यालयाद्वारे आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी आमदार नाना पटोले, प्रमुख उपस्थितांमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जिभकाटे, समाजकल्याण सभापती मदन रामटेके, शिक्षण सभापती रमेश पारधी, महिला व बालकल्याण सभापती स्वाती वाघाये, पंचायत समिती सभापती प्रणाली सार्वे, जिल्हा परिषद सदस्या सुर्मिला पटले, डॉ. मनिषा निंबार्ते, सरिता कापसे, विद्या कुंभरे, पंचायत समिती सदस्य रवींद्र(दादू) खोब्रागडे, विकास वासनिक, सुनील बांते, पंचायत समिती सदस्या मनीषाहलमारे, योगिता झलके, तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर, गटविकास अधिकारी अरुण गिरेपुंजे, सहाय्यक गटविकास अधिकारी मुलचंद केवट, पोलिस निरीक्षक सत्यवीर बंडीवार, सर्व विभागाचे विभाग प्रमुख, सरपंच, ग्रामसेवक, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांचे प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. राष्ट्रपिता महात्मा गांधी तथा संविधान निमार्ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण, दिप प्रज्वलन तथा राष्ट्रगीताने आमसभेला सुरुवात करण्यात आली. पंचायत समितीच्या महिला कर्मचाºयांच्या स्वागत गीताने उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. गटविकास अधिकारी अरुण गिरेपुंजे, सरपंच संघटना व ग्रामसेवक संघटनेचे वतीने सभाध्यक्ष आमदार नाना पटोले तथा सभापतींचा शाल, शिवाजी महाराजांची प्रतिमा व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

नियोजित वेळेपेक्षा २ तास उशिरा आमसभा सुरू झाली. मागील सभेचा वृत्तान्त वाचून कायम करणे. या विषयावर साधकबाधक चर्चा करून ठरावास मंजुरी प्रदान करण्यात आली. विषय क्रमांक २ मध्ये कृषी, ग्रामीण पाणीपुरवठा, आरोग्य, बांधकाम, लघुपाटबंधारे, पशूसंवर्धन, बालविकास सेवा योजना, शिक्षण, राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान, घरकुल, पंचायत, वीज वितरण, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना इत्यादी विभागाद्वारे केल्या गेलेल्या विकास कामांचा आढावा सादर करण्यात आला. कृषी, आरोग्य, पाणी पुरवठा, मग्रारोहयो विभागातील अधिकाºयांना जास्त खडेबोल सुनावण्यात आले. चर्चेत सरपंचासह महिला सरपंचांनीही सहभाग नोंदवून अधिकाºयांना धारेवर धरले. पण सभाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी बाजू सावरली. काही विभागाचे अधिकारी अथवा त्यांचे प्रतिनिधी आमसभेत अनुपस्थित राहिल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. चालू आर्थिक वर्षात विकास योजनांबाबद सविस्तर चर्चा करण्यात आली. भारतीय जनता पक्षाचे जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य आमसभेला अनुपस्थित होते. आमसभेचे सूत्र संचालन पंचायत विस्तार अधिकारी प्रमोद हुमने, प्रास्ताविक गटविकास अधिकारी अरुण गिरेपुंजे तर आभार कृषी विस्तार अधिकारी के.एन. चव्हाण यांनी मानले. रात्री १०:०० वाजता पर्यंत आमसभा चालली. हे विशेष.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *