जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकरी देणार नागपूर अधिवेशनावर धडक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : खोडकिडा व पेरवा या रोगाने मोठया प्रमाणात जिल्ह्यातील शेतकºयांचे आर्थिक नुकसान झाले असुन यासंदर्भात अनेकदा निवेदन देवुनही सरकारतर्फे त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.करीता नुकसान झालेल्या धान उत्पादक शेतकºयांना एकरी २० हजार रूपये आर्थिक मदत देण्यात यावी यासह इतरही मागण्यांना घेवुन अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकºयांचा नागपूर येथे पुढील महिन्यात होणाºया हिवाळी अधिवेशनावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. भंडारा जिल्ह्यात अतिवृष्टी, खोडकिडा व पेरवा या रोगाने मोठया प्रमाणात धान पीकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला असून आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असताना सुद्धा शासनाने अजून पर्यंत कुठलीही मदत केली नाही. ही अत्यंत शोकांतिका असून सरकार शेतकरी विरोधी असल्याचे यामधुन दिसुन येते.

सरकारच्या या निषेधार्थ नागपूर येथील हिवाळीअधिवेशनावर अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. अतिवृष्टी, खोडकिडा, पेरवा या यामुळे नुकसानग्रस्त धानपिक उत्पादक शेतकºयांना एकरी २० हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच आधारभूत धान खरेदी केंद्रावर नोंदणी करण्याची अटक शिथील करून सर्वच शेतकºयांना सरसकट बोनस देण्यात यावा अशी मागणी निवासी जिल्हाधिकारी लीना फलके यांचे मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना देण्यात आलेल्या निवेदनातुन करण्यात आली आहे. निवेदन देतांना अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे ,विष्णुदास लोणारे, पुरुषोत्तम गायधने, व्यंकटेश्वर गायधने ,कोठीराम पवनकर, दशरथ शहारे ,कविता लोणारे नितेश बोरकर आदि उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *