खा. पटेल यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळाव्याचे नियोजन करण्यासंबंधी बैठक

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भंडारा जिल्हा राष्ट्र- वादी कांग्रेस पार्टीतर्फे दि. २१ आॅगस्ट २०२३ रोज सोमवारला सभा आयोजित करण्यात आली. यामध्ये खा. प्रफुल पटेल राज्यसभा सदस्य तथा राष्ट्रीय कार्याध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा दि.२३ आॅगस्ट २०२३ रोजी आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यकर्ता मेळाव्यास यशस्वी करण्याकरीता राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष नाना पंचबुध्दे, यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रदेश महासचिव धनंजय दलाल, माजी नगराध्यक्ष महेंद्र गडकरी, अ‍ॅड. जयंत वैरागडे, महिला जिल्हाध्यक्षा श्रीमती सरिता मदनकर, अ‍ॅड. विनयमोहन पशिने यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली, तसेच कार्यक्रमाचे नियोजन करण्याकरीता मार्गदर्शक सुचना देण्यात आल्या.

याप्रसंगी उपस्थितांमध्ये बाबुराव बागडे, हेमंत महाकाळकर, नरेंद्र झंझाड, रविंद्र वानखेडे, डॉ. श्रीकांत वैरागडे, सौ. किर्ती गणविर, आरजु मेश्राम, सौ.मंजुषा बुरडे, संजय वरगंटीवार, प्रदीप सुखदेवे, पद्माकर चेटुले, सौ. कांचन वरठे, सौ. गिता कागदे, रजनिश बन्सोड, राहुल निर्वाण, उमेश ठाकरे, राजु सलाम पटेल, विक्रम उजवणे, मनिष वासनिक, उमेश ठाकरे, सुनिल साखरकर, गणेश बाणेवार, राजेश डोरले, रुपेश खवास, अमन मेश्राम, भोजराज वाघमारे, निरज शहारे, अमुद रामटेके, शामलाल वकलकार, सुहास कढव, मंगेश थोटे, सोनु कनोजे, शाहरुख शेख, देवेंद्र वाघमारे, संजय लांजेवार, अरुण अंबादे, रोहित सार्वे, प्रभाकर बोदेले, फरहान पटेल, मो. मुश्ताक हाजी सलाम, डॉ. अनिता महाजन, भिमराव मेश्राम, संदेश वासनिक, योगेश गजभिये, सौ. निशा राऊत, किर्ती कुंभरे व फार मोठया संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *