सिहोरा-बपेरा परिसरातील पांदण रस्ते चिखलमय

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी सिहोरा : सिहोरा-बपेरा परिसरातील शेतशिवारात शेतकºयांच्या सोयी करिता पांदन रस्ते तयार करण्यात आली असली तरी बहुतांश रस्त्यावर अनेक वर्षांपासून मुरूम घालण्यात आले नाही. यामुळे पांदन रस्ते चिखलमय झाली आहेत. सिहोरा-बपेरा परिसरात शेतशिवारात रोजगार हमी योजने अंतर्गत पांदन रस्त्याचे माती काम करण्यात आली आहेत. परंतु, या पांदन रस्त्याचे कामावर गेल्या अनेक वर्षांपासून मुरूम घालण्यात आले नाही. शासनाच्या रोहयो अंतर्गत कुशल कामे करण्यात आली होती. यंत्रणेच्या नावावर कंत्राटदारांनी कामे केली होती. या निमित्ताने कामे झाली असली तरी राज्य शासनाने रोहयोचा निधी उपलब्ध केला नाही. या कालावधीत निधीकरिता बोंबाबोंब झाली. राज्य शासनाने रोजगार हमी योजने अंतर्गत कुशल कामाचे अनुदान राशी देत असल्याचे कारणावरून यंत्रणेमार्फत नाक तोंड दाबण्यात आले.

ग्रामपंचायत अंतर्गत कुशल कामाचे नियोजन आणि प्रस्ताव तयार केले नाही. निधी आणि दुर्लक्षीतपणाचा फटका पांदन रस्त्याच्या विकास कामांना बसला आहे. राज्यात सत्ता परिवर्तन होताच कुशल कामाचे थकीत निधी देण्यात आला आहे. यामुळे कंत्राटदार व यंत्रणेच्या आशा पल्लवीत झाल्या. नव्याने विकास कामाचे नियोजन करण्यात येत आहे. पांदण रस्त्यांना मुरूम आणि खडीकरण झाले असते तर रस्ते चिखलमय होण्याची पाळी आली नसती. ग्रामीण भागातील शेतकºयांना या पांदन रस्त्याचा मोठा त्रास होत आहे. पांदन रस्त्यावर चिखलच चिखल असल्याने वाट काढतांना तारेवरची कसरत करावी लागते. या रस्त्यात शेतकºयांची वाहने तथा बैल जोडया अडत आहेत. या शिवाय पायदळ जातांना कसरत करावी लागत आहे. या पांदन रस्त्यांवर तात्काळ मुरूम कामांना मंजुरी देण्याची ओरड शेतकरी करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *