रब्बी पिकांना अवकाळीचा फटका

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली: साकोली तालुक्यात शनिवारच्या मध्यरात्री वातावरणात अचानक बदल होऊन मेघगर्जना, वादळी वारा आणि जोरदार पाऊस आल्याने तालुक्यातील शेतात असलेल्या रब्बी पिकांचा मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी पावसाचे आगमन झाले तेव्हा लोकं गाढ झोपेत होती. त्यामुळे एकच धावपळ सुरु झाली. अनेक गावात माकडानी कौलारू घरे फोडल्याने लोकांच्या घरात पाणी शिरले. रात्र असल्यामुळे आणि विज पुरवठा खंडित झाल्याने शेतकरी शेतात जाऊ शकले नाही. सकाळी जेव्हा शेतकरी शेतात गेले तेव्हा पिकांना बघून आपल्या माथ्यावरच हाथ ठेवला. साकोली तालुक्यातील बहुतेक क्षेत्रात भाजीपाला पिकं घेतली जातात.

या पिकांना गारपिटचा तडाका बसला आहे. वांगी, टमाटर, मिरची, कोबीसह इतर पिके तसेच हरभरा, मुंग, गहू, आणि शेतात उभी असलेली इतर पिके नाशधुश झाली आहे. नुकसान झालेल्या पिकांचा प्रशासनाने लवकर पंचनामा करावा आणि नुकसान भरपाई मिळावी अशी शेतकºयांची मागणी आहे. या अवकाळी संकटाने शेतकºयांच्या हातचे पिके गेली आहेत. उत्पादन मिळेल याची हमी राहिली नाही. शेतासाठी लागलेला पैसाही आता निघणे कठीण झाले आहे. या अवकाळी पावसाची जागृती पाहिजे तेवढी प्रशासनाने केली नसल्याने शेतकरी तयारीत नव्हता. एक दोन दिवसापूर्वी अवकाळीची माहिती असती तर थोडे फार पिके वाचविता आले असते. परंतु अचानक आलेल्या या पावसामुळे तालुक्यात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *