जीवाच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा आणि आवश्यक घटक पाणी-विवेक बोंद्रे

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी जवाहरनगर :- जीवाच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा आणि आवश्यक घटक पाणी आहे. मानवी शरीराच्या अंदाजे ७० टक्के पेशींमध्ये पाणी आढळते. रक्त, लाळ, पाचक एन्झाईम्स, लघवी इत्यादींसह शरीरातील सर्व द्रवांचा स्रोत शुद्ध पिण्याचे पाणी आहे. पाणी शरीराच्या सर्व कार्यांचे नियामक आहे. त्यामुळे शुद्ध पाणी पिण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे आपल्याकडचे निम्मे आजार अशुध्द पाणी आणि अस्वच्छतेमुळे होतात. पटकी, गॅस्ट्रो, पोलिओ, कावीळ, हगवण, जंत, त्वचारोग, विषमज्वर, इत्यादी अनेक आजार अशुध्द पाणी व अस्वच्छता यांमुळेच होतात. यातून कुपोषण वाढते.

शुध्द पाणीपुरवठा व स्वच्छता या उपायांनी औषधोपचारांची गरज निम्म्याने कमी होईल. दुषित पाण्याचे शेवन केल्याने आरोग्यावर खूप परिणाम घडतात त्यामुळे आर्थिक स्थिती कमकुवत होत असते याकरिता पाण्याचे महत्त्व समजून शुद्ध व स्वच्छ पाणी सेवन करणे ,पाण्याची गरज लक्षात घेऊन आवश्यक तेवढेच पाणी वापर करायला पाहिजे, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा भंडारा चे विवेक बेंद्रे यांनी उमेद अभियानातील महिला सबलीकरण व महिलाच्या आरोग्य या विषयावर मार्गदर्शन करताना उद्घघाटकीय मार्गदर्शनात मनोगत व्यक्त केले महाराष्ट्र राज्य ग्रामीण विकास अभियान ( उमेद) व वॉटर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वॉश इकोसिस्टम प्रकल्प अंतर्गत एकदिवशीय भंडारा जिल्हास्तरीय कार्यशाळा दिनांक २९ आॅगस्ट ला दि नॅचर प्राइड रिसॉर्ट रावणवाडी या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती

या कार्यक्रमाचे उद्घाटक विवेक बेंद्रे प्रकल्प संचालक तथा जिल्हा अभियान सहसंचालक महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान भंडारा यांच्या हस्ते तर गौरव कुमार तुरकर जिल्हाअभियान व्यवस्थापक म.ग्रा. जी. अ. भंडारा, जितेंद्र गेडाम सह व्यवस्थापक आय बी सी बी दिलीप पाटील सह व्यवस्थापक आर्थिक सुनील पटले तालुका व्यवस्थापक सविता तिडके तालुका व्यवस्थापक, पुरुषोत्तम बिसेन, तालुकाव्यवस्थापक,रविता शेगावकर, तालुका व्यवस्थापक अश्विन बनसोड ,तालुका व्यवस्थापक शशिकांत तलमले तालुका व्यवस्थापक, सागर सलील, शिल्पा मेंढे, आगरकर तालुका व्यवस्थापक आर्थिक व सर्व, समुदायस्तरीय प्रशिक्षक सल्लागार प्रभाग समन्वयक सर्व इत्यादी उपस्तीत होते.

या कार्यशाळेचे प्रास्ताविक शिल्पा मेंढे यांनी मांडले. गौरव कुमार तुरकर यांनी समुदाय प्रशिक्षण सल्लागार यांच्या कामाचे महत्व समजावून दिले त्यात अधिक कार्यक्षम कार्य करणे, गावातील परसबाग त्यातील होणाºया ओर्गानिक भाजीपाला त्यातून होणारा आरोग्यावर चांगला परिणाम घडत असल्याचे सांगितले तसेच वॉटर संस्था अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळा महत्वपूर्ण ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली सागर सलील सर यांनी घरगुती शौचालय आणि न्हाणी घराचे फायदे, घरगुती नळ फायदे बँकेतून मिळालेल्या पाणी स्वच्छता आणि आरोग्य कर्जाचे फायदे,बाथरूमघर दुरुस्ती, नळ जोडणी पावसाचे पाण्याचे संकलन, पाण्याची टाकी या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. शिल्पा मेंढे यांनी वॉटर संस्था काय व त्याचे काम याविषयी मार्गदर्शन केले एकदिवसीय कार्यशाळेचे यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आगरकर यांनी केले

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *