अधिकाºयांच्या सत्काराला बुके नको, बुक किंवा रोपटे द्या..!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : वृक्षाचं आच्छादन कमी असलेल्या भंडारा जिल्ह्यात वृक्ष लागवडीला चालना मिळावी, यासाठी वृक्षारोपण ही लोकचळवळ बनणे गरजेचे आहे. त्यामुळे यापुढे कोणत्याही स्वागत, सत्काराला बुके ऐवजी पुस्तक किंवा रोपटे स्वीकारण्याचा निर्णय आपण घेतला असून आता सत्काराला ‘बुके’ नको, तर बुक किंवा रोप द्यावे, असे आवाहन नवनियुक्त उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे यांनी केले. तुमसर येथे नवनियुक्त उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे यांनी पदाचा कार्यभार स्वीकारल्याने स्वराज्य युवा एकता फाउंडेशन तुमसरच्या माध्यमातून बुधवारी त्यांना पर्यावरण हिताच्या दृष्टीने वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते. शासकीय कार्यालयात येणाºया व्यक्तींकडून किंवा कोणत्याही समारंभात स्वागत बुके देवून केले जाते. मात्र, आता उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे यांनी स्वागत, सत्कारामध्ये बुके ऐवजी पुस्तक किंवा रोपटे स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्ह्यातील वृक्षाच्छादन वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड आणि झाडांचे संगोपन होणे आवश्यक आहे. वृक्ष लागवड ही चळवळ झाली तरच जिल्ह्यातील वृक्षांची संख्या वाढण्यास मदत होईल. त्यामुळे यापुढे सत्कार, स्वागताला बुके ऐवजी पुस्तक किंवा रोपटे स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील नागरिकांनीही विविध समारंभ आयोजित करताना बुके ऐवजी रोप किंवा पुस्तक देवूनच मान्यवरांचे स्वागत करावे. यानिमित्ताने जिल्ह्यात वृक्ष लागवड आणि संगोपनास चालना मिळेल, असे उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे यांनी म्हटले आहे. यावेळी स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित एच. मेश्राम, शाखा प्रमुख विजेंद्र महाकाळकर यासह तहसीलदार बाबासाहेब टेळे, नायब तहसिलदार संजय जांभुळकर, भुमेश्वर पेंदाम, रमेश खोकले, तालुका पुरवठा अधिकारी राहुल वानखेडे, कनिष्ठ लिपिक नितीन बघेल, विलास सूर्यवंशी, वरीष्ठ लिपिक हेमराज लांजेवार, कनिष्ठ लिपिक मयूर जावळकर, पुरवठा निरीक्षण प्रवीण आंबूलकर, हितेश रहांगडाले, शिपाई हेमंत गराडे, गणेश क्षिरसागर, रोहित नरखेडे, जयसिंग रावते, विजय कारेमोरे यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *