महिला कर्मचाºयांच्या गुणवत्तेमुळे महावितरणच्या कार्यक्षमतेत मोठी वाढ : प्रादेशिक संचालक रंगारी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : महावितरण मध्ये महिला विद्युत सहाय्यक ते मुख्य अभियंता अशा सर्वच पदांवर महिला सक्षमपणे काम करीत आहे.त्यांच्या कर्तृत्वामुळे महावितरणच्या कार्यक्षमतेत व नावलौकिकात मोठी वाढ झाली आहे, अशा शब्दात महावितरणचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांनी महावितरण मधील महिला कर्मचाºयांचे कौतुक केले. नागपूर प्रादेशिक विभाग व नागपूर परिमंडल कार्यालय असलेल्या विद्युत भवन येथे महिला दिनानिमित्त महिला कर्मचाºयांचा गौरव करण्यात आला.या प्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्याअध्यक्षस्थनावरून रंगारी बोलत होते. महावितरणच्या महिला कर्मचाºयांचे कार्यालयीन कामांसह खेळ,नाट्य व इतर उपक्रमांत नेहमीच महत्वपूर्ण योगदान असते, असे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

महिलांच्या विकासावरच समाजाचा व देशाचा विकास अवलंबून आहे. महावितरण मधील महिला लाईनमनने आपल्या कार्याने स्वत:चा वेगळा ठसा निर्माण केला आहे, अशी प्रशंसा मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी केली. भारतीय संस्कृती व भारताच्या प्रगतीत महिलांचे सर्वाधिक योगदान आहे असे मत महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) शरद दाहेदार यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमात अधीक्षक अभियंते अविनाश सहारे,हरीश गजबे,उप महाव्यवस्थापक(माहिती व तंत्रज्ञान) प्रमोद खुळे प्रामुख्यानेउपस्थित होते. या गौरव सोहळ्यात प्रादेशिक,परिमंडल,नागपूर ग्रामीण विभाग, नागपूर शहर विभाग या कार्यालयातील मानव संसाधन, माहिती व तंत्रज्ञान,स्थापत्य,पायाभूत आराखडा,गुणवत्ता व नियंत्रण, औद्योगिक संबंध विभाग या विभागातील महिला अधिकारी, अभियंते व कर्मचाºयांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मंजुषा आडे व मनीषा चोकसे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात प्रणाली विश्लेषक प्रसन्ना येळणे,समिर सिंघम व पंकज साटोणे उपस्थित होते. प्रास्ताविक अंजली देशपांडे यांनी संचालन प्रवीण स्थूल यांनी तर आभार प्रदर्शन अमित पेडेकर यांनी केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *