बालकांनी आणला आनंद मेळाव्यात’स्वाद’

Anand Mela – NOEL SCHOOL

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : लहानग्या हाताने विविध व्यंजनांची गोड तिखट चव देणाºया आनंद मेळाव्यात विद्यार्थी, पालक व गावकºयांनी आस्वाद घेतला. उद्योगशिल व स्वकमाईच्या उपक्रमाचे शिक्षण विभागाने कौतुक केले. मोहाडी तालुक्यातील वरठी पोलीस स्टेशन हद्दीतील मोहगावदेवी येथील जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेत आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मोहगाव केंद्रीय शाळेत झालेल्या आनंद मेळाव्याचे उद्घाटन शाळा समितीचे अध्यक्ष विनोद लेंडे यांनी केले. शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उमेद लेंडे, मुख्याध्यापक सुनंदा वाढीवे, प्रमोद लेंडे, कृष्णा लेंडे, सुनील लेंडे, राजकुमार बाळबूधे, रमेश साखरवाड़े, सुनीता पडोळे, रमेश लेंडे यांची उपस्थिती होती. शाळेत? विद्यार्थ्यांसाठी एक वेगळा आणि? नावीन्यपूर्ण अनुभव व प्रत्यक्ष? कृतीतून व्यवहार ज्ञानाचे शिक्षण? देण्यासाठी हा बाल आनंद मेळावा? उपयोगी ठरेल असे मत शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के यांनी व्यक्त केले. स्वकर्तृत्वाने लहान बालकेही उंच भरारी मारू शकतात.
केवळ त्यांना दिशा देणारे पथदर्शक हवेत असे विचार शाळा समितीचे अध्यक्ष विनोद लेंडे यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांमध्ये कला उपजत असते. त्या कलेला व्यासपीठ निर्माण करून दिले पाहिजे असे मुख्याध्यापक सुनंदा वाढीवे यांनी सांगितले. आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी ४० स्टॉल लावले होते. यात सांबारवडी, गुलाब जामुन, अप्पे, पास्ता, नूडल्स, साबुदाणा खिचडी, भेळ, उपमा, पापड, पाणीपुरी, भजी, इडली, कांदेपोहे आदी व्यंजनांचे स्टॉल लावले होते. याशिवाय वालाच्या शेंगा, लवकी, हिरवा हरबºयाच्या जुड्या विक-्रीला लावल्या होत्या.
आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध स्वजनांचा आस्वाद घेतला. आनंद मेळाव्यात गुलाबजाम व सांबारवडी भारी ठरली. गावकºयांनी तसेच शिक्षक वर्गानी या आनंद मेळाव्यात पदार्थांची खरेदी करून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. लहानग्या विद्यार्थ्यांनी विविध पदार्थ तयार व विक्री करून साधारणत:२७००रुपयांची खरी कमाई केली. या स्तुत्य उपक्रमाला पंचायत समिती मोहाडीचे गटशिक्षणाधिकारी मनीषा गजभिये, शिक्षण विस्तार अधिकारी अशोक खेताडे उपक्रमांची प्रशंसा केली. आनंद मेळावा यशस्वी करण्यास सहायक शिक्षक अमृता करनायके, शैलेश शाहू, पल्लवी शेंडे, कुंदा कारेमोरे, किरण पाटील यांनी सहकार्य केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.