गुरे-ढोरे बांधण्यावरुन झालेल्या वादात विद्यार्थीनी गंभीर जखमी

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : श्री संत जगनाडे चौक मोह- ाडी येथून ३ किमी अंतरावर जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा कुशारी येथील शाळेच्या गेटसमोर असलेल्या गायधने कुटुंबातील निवासस्थान आहे. घराच्या समोर असलेल्या शासकीय रोडवर गुरे-ढोरे बांधण्याच्या कारणावरून एकमेकांना धक्का-बुक्की करून जखमी केल्याची घटना घडली. जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय मोहाडी येथील इयत्ता बारावीत शिक्षण घेत असलेली विद्यार्थीनी मध्यस्थी करायला गेली असता गंभीर जखमी झाली. प्राप्त तक्रारीनुसार, असे की यातील कुशारी येथील अर्जदार रविंद्र महादेव गायधने व गैरअर्जदार अभिमन परसराम गायधने, विठ्ठल परसराम गायधने, प्रशांत शालीकराम गायधने हे एकाच जातीचे असुन एकमेकांचे आमोरासमोर राहतात. त्यांचे घराचे मधोमध ग्रामपंचायतचा डांबरीरस्ता असुन त्या रस्त्यावर गैरअर्जदार अभिमन परसराम गायधने हे आपले गाईढोरे बांधतो. घटना सोमवार दि.१७ जुलै २०२३ ला रात्री ९ वाजता सुमारास झाली.

अर्जदार रविंद्र महादेव गायधने हा आपले घरी हजर असता गैरअर्जदार रविंद्र महादेव गायधने याने अर्जदारला हाक मारून घराबाहेर बोलवून तु रस्त्यावर ट्रैक्टर का ठेवतोस असे बोलला तेंव्हा अर्जदार रविंद्र महादेव गायधने याने गैरअर्जदार यास तु आपले गाईढोरे रस्त्यावर का बांधतोस असे बोलल्याने गैरअर्जदार रविंद्र महादेव गायधने याने जास्त बोलतेस का असे बोलून शिविगाळी करत असता गैरअर्जदार विठ्ठल परसराम गायधने व प्रशांत शालीकराम गायधने हे आले व अर्जदार रविंद्र महादेव गायधने तुझा ट्रॅक्टर रोडावर का ठेवतोस असे बोलून शिविगाळी करून धक्काबुक्की करून लाथाबुक्याने मारपिट करत असता भांडण सोडवण्यासाठी अर्जदारची १८ वर्षीय मुलगी कु.पायल गायधने आली असता गैरअर्जदार अभिमन परसराम गायधने, विठ्ठल परसराम गायधने, प्रशांत शालीकराम गायधने यांनी तिला सुद्धा शिविगाळी केली व मारण्यास अंगावर धावले.

गैरअर्जदार यांनी अर्जदारला व त्यांचे मुलीला शिविगाळी करून अर्जदारला ढकलढुकल करून बुक्याने मारपिट केली व पुन्हा मारण्याची धमकी दिली असे अर्जदारचे तोंडी तक्रारीवरून पोलीस हवालदार रामरतन लक्ष्मण खोकले यांनी आॅनलाइन नोंद करण्यात आली. जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय मोहाडी येथील इयत्ता बारावीत शिक्षण घेत असलेली विद्यार्थीनीला छातीला अंदरूनी आणि हाताला मार असल्याने मोहाडी येथील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आली आहे. गुरुवार दि.२० जुलैला भेट दिली असता छातीत आतील भागात मुका मार असल्याने तिला भंडारा येथे जिल्हा सामान्य रुग्णालय उपचारासाठी नेण्याचा सल्ला डॉक्टर गजभिये यांनी दिला आहे. कुशारी येथील अर्जदार रविंद्र महादेव गायधने यांच्या तक्रारीवरून मोहाडी पोलिसांनी भारतीय दंड संहिता ३२३, ५०४, ५०६ गैरअर्जदारविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. सदर प्रकरण अदखलपात्र स्वरुपाचे असल्याने अर्जदारला कोर्टात दाद मागण्याची समझ देण्यात आली असून पुढील तपास ठाणेदार प्रदीप पुल्लरवार यांच्या मार्गदर्शनाखाली बिट अंमलदार राजेश गजभिये हे करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *