शुन्यातून उंच भरारी मारणाºया संतोष लांजेवारची यशोगाथा

शि वाजी वार्ड, शुक्रवारी भंडारा येथील रहिवासी कृष्णा लांजेवार कुटुंब. घरात अठरासे विस दारिद्रय. घराचे छत फाटलेले, वडिलोपार्जित शेती नाही. घरात आई- पत्नी, दोन मुले व एक मुलगी, कुंटुबांचे पालन पोषण करण्याची महत्वपूर्ण जबाबदारी पेलवने अशक्य होते. तरी सुध्दा नगर परिषदेच्या दिनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत रोशनी महिला बचत गटाच्या माध्यमातून स्वयंरोजगार करण्याकरिता मालती लांजेवार या महिलेला २५% अनुदानासह दोन लाखांचे अर्थसाहाय्य उपलब्ध करून दिले. त्यातुन मिरची कांडप मशीन घेऊन उद्योगाला सुरूवात केली. सुखी संसाराचे स्वप्न रंगवित असतांना मुलांना योग्य शिक्षण देऊन संस्कारमय आदर्श नागरिक घडविणे हा होता. कारण मुले हीच संपत्ती आहे. आणि व्यवसायाच्या माध्यमातून कुटुंबाला आर्थिक पाठबळ मिळाले. मुलामुलींचे लग्न केले. गरिबीतून पुढे येत संपुर्ण कर्जाची परतफेड केली.

उद्योग धंद्याला योग्य चालना व गरिबीतुन सक्षम करण्याकरिता भंडारा नगर परिषदेच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले. मालती लांजेवार यांनी कर्जाची परतफेड केल्यावर मुलगा संतोष लांजेवार याला पुन्हा दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान स्वयंरोजगार कार्यक्रमांतर्गत विदर्भ कोकण ग्रामीण बँकेमार्फत १ लक्ष ८० हजार रुपये अर्थसाहाय्य वितरण करण्यात आले. त्यातून पुन्हा हळद व आटा चक्की खरेदी केली. त्यामाध्यमातून सुरू असलेल्या व्यवसायात पुन्हा भर पडली. पाहता -पाहता मालती आटा चक्की प्रकाश झोतात येऊन यशाचे शिखर गाठायला सुरूवात झाली. दरदिवशी त्यांना ४०० ते ५०० रुपये लाभ मिळत होता. घरात आलेल्या नविन सुनेला व्यवसायाविषयी माहिती दिली. नंतर शितल संतोष लांजेवार ही सुध्दा अविष्कार महिला बचत गटाची सक्रिय सभासद झाली.

या दरम्यान दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत अविष्कार महिला बचत गटातील महिलांना विविध गृह उद्योगाचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणाला प्रोत्साहित होऊन उत्पन्न वाढविण्याकरिता त्यांच्या पत्नी शितल संतोष लांजेवर यांनी अविष्कार महिला बचत गटाला बंकेमार्फत प्रथम १२५हजार रुपए व द्वितीय २५० हजार रुपए कर्ज प्राप्त झाले होते. शितल संतोष लांजेवर यांनी बचत गटामधून कर्ज घेऊन व्यवसाय वाढविण्याच्या दृष्टीने मिरची कांडप व हळद, मसाला व पापड, सेवया, कुरुड्या तयार करण्याकरिता मशीन खरेदी केली. त्यामुळे त्यांच्या व्यवसायाला नवी चालना मिळाली. कोरोनाच्या काळात गहू खरेदी करून पिसाईच्या माध्यमातून आटयाची विक्री करत असतांनी आट्याला मोठी मागणी होती. नागरिकांना गहू पिसाई करून आटा पॅकेट विक्री व गहू स्वच्छ (फिल्टर) करण्याची सुविधा उपलब्ध करून देता येऊ शकते. त्यांनी ठोक भावामध्ये गहू खरेदी करून स्वताच्या आटाचक्की मध्ये आटा तयार करून शहरातील व शहारच्या बाहेरील हॉटेल, किराणा दुकानामध्ये जाऊन विकायचे, यामधून त्यांना महिन्याला ३० ते ४० हजार रुपयांचा नफा होत असे.

या व्यवसायमध्ये त्यांना चांगलाच अनुभव आला. त्यांचा या कामाची दखल दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत घेण्यात आली. त्यांना व्यवसाय वाढविण्याकरिता मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर आॅटोमॅटिक आटा मिल सुरू करण्याकरिता मशीनरी व साहित्य खरेदी करिता संतोष लांजेवार लाभाथीर्ने भंडारा नगर परिषद येथे कर्ज सुविधा उपलब्ध तेबाबत माहिती घेतली. नगर परिषद भंडारा येथील शहर प्रकल्प व्यवस्थापक प्रविण पडोळे यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेबाबत माहिती दिली. व त्यानुसार ऊफढ यांनी या योजने अंतर्गत ग्रीशा फूड इंडस्ट्रीजच्या माध्यमातून μलोअर मिल गव्हाचे पीठ, गहू फिल्टर (स्वच्छ) करून विक्री करण्याचे कर्ज प्रस्ताव तयार करून भंडारा येथील यूनियन बँक आॅफ इंडिया शाखा बँक व्यवस्थापक राहुल चेटूले यांनी यूनियन बँकेकडून ३३. ९० लक्ष कर्ज मंजूर करून वितरित करण्यात आले. ढटऋटए त्यानुसार मोहाडी तालुक्यात येणाºया पाहुणी (खात रोड) येथे ग्रीशा फूड इंडस्ट्रीज कंपनीची (उद्योगाची) स्थापना २० मार्च २०२३ ला करण्यात आली. यात गव्हाच्या पीठाची विक्री करणे, शेतकºयांचे गहू फिल्टर (स्वच्छ) करून देणे व विक्री करणे (उत्पादने) या उत्पादनांची निर्मिती करण्यात येते. योजनेंतर्गत ८ लाख ७१ हजार ५०० रूपयांचे अनुदाना करिता संतोष लांजेवार पात्र झाले आहे. सदर यंत्र सामग्रीच्या माध्यमातून प्रतिदिन उत्पादन क्षमता ५ टन आटा पिसाई व २५ टन गव्हू फिल्टर (स्वच्छ) केले जात आहे. त्यामध्ये उत्पादनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढून येत आहे.

उत्पादनाची विक्री जिल्ह्याबाहेर सुरू आहे. आणि यापासुन मासिक २ लक्ष शुध्द नफा मिळवत आहे. हा व्यवसाय सुरु केल्यानंतर आज पर्यंत यशस्वी आणि उन्नती झाल्याचे ग्रीशा फूड इंडस्ट्रीज द्वारे नागरिकांना मालती आटा मिल व गहू स्वच्छ, फिल्टर करणे या बाबतची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्धार केला आहे. या युनिटला अपेक्षेपेक्षा मोठ्या प्रमाणात नागरिकांचा व त्या परिसरातील शेतकºयांचा सक्रिय सहभाग मिळत आहे. ग्रीशा फूड इंडस्ट्रीज कंपनीच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या मालती आटा नागपुर, गोंदिया, भंडारा जिल्हयासह शहरातील हॉटेल, खानावळ, किराणा दुकानामध्ये पुरविला जातो. तसेच महाराष्ट्र, मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातील काही शहरामध्ये मालती आट्याची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. ढटऋटए त्यामाध्यमातून आज आपण स्थानिक व राज्यस्तरावर गहू आटा व गहु स्वच्छ, फिल्टर करून देण्याची सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *