रोहणा येथील गायमुख नाल्यातून वाळू चोरी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मोहाडी : स्थानिक तहसील व पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या रोहणा येथील गायमुख नाल्यातून पहाटेला मोठ्या प्रमाणात दहेगाव येथील वाळू माफिया अवैध वाळू चोरी करीत आहेत. याकडे महसूल विभाग व पोलीस विभाग मोहाडीचे पूर्णत: दुर्लक्ष आहे. महसूल व पोलीस विभागाला वाळू माफियाकडुन हμता मीळत असल्याने कारवाई करीत नसल्याचे बोलल्या जात आहे. रोहणा येथिल गायमुख नाल्यातून अवैध वाळू तस्करी जोरात सुरू असतानी महसूल आणी पोलीस विभाग पैसे घेवुन कुंभकर्णी झोपेत आहे. काही दिवसापूर्वी मोहाडी पोलीसाच्या पथकाने अवैध रेती भरलेले ट्रक्टर पकडुन पोलीस ठाण्यात लावले होते. त्या नंतर अवैध वाळू चोरणाºया वाहनावर कारवाई झाल्याचे ऐकीवात नाही.

गायमुख नाल्याच्या पश्चिमेस दहेगाव येथील शेतकºयांची शेती आहे .तर पूर्वेस रोहणा येथील शेतकºयांची शेती आहे. यावर्षी आलेल्या पुरामुळे गायमुख नाल्यात मोठ्या प्रमाणात पांढरी शुभ्र वाळू वाहून आली, याच संधीचा फायदा घेत वाळू माफियां ट्रक्टर द्वारे नाल्यातून वाळू बाहेर काढून चढ्या दराने विक्री करीत आहेत. दहेगाव येथील दोन ट्रक्टरचे चालक, मालक हे सकाळी ५ वाजता पासुन वाळू चोरी करीत आहेत. दहेगाव येथील वाळू चोरानी गोम्रसे नामक शेतकºयांला पैसे देवून त्यांच्या शेतातून वाळूचे ट्रक्टर जाण्यासाठी बांध फोडून रस्ता तयार केला आहे. या रस्त्याने ते दहेग्रव, मोहाडी कडे ट्रक्टरने वाळू घेवुन जातात. या वाळू माफिया मध्ये एका माजी उपसरपंच्रचा तर एका तरूण राजकारणी मुलाचा समावेश आहे. हे दोघेही पहाटे पासुन महसूल वपोलीस कर्मचाºयांवर पाळत ठेवतात. ट्रक्टर वेगात चालवले जात असल्याने नहरची व प्रन्दन रस्त्याची दुरावस्था होवुन अपघाताची शक्यता बळावली आहे.

हे अवैध धंदे स्थानिक पोलीस व महसूल विभाग यांनाही दिसतात पण ते जाणून पैश्याच्या लोभापायी आंधळे बनतात. पहाटे पासुन येथे अवैध वाळू व्यवसाय सुरू असूनही यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केल्या जात नाही. अनेक तक्रारी गावकºयांनी केल्या मात्र वरीष्ठ अधिकाºयानीही लक्ष दिले नाही. कारवाई होत नसल्यानेच अवैध धंदया वाल्याचे मनोबल वाढलें आहे. एखाद्या वैध वाळू घाटालाही लाजवेल असा या ठीकाणी अवैध वाळू व्यवसाय जोमात सुरू आहे. हा अवैध वाळू व्यवसाय बंद करून सदर ट्रक्टर वर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी रोहणा ग्रामवाशीयांनी केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *