गांधी सागर तलावाच्या काठावर कचरा फेकणाºयांवर दंडात्मक कारवाई करा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : शहरातील सेठ नर्सिंगदास मोर महाविद्यालया कडे जाणाºया रस्त्यावरील हनुमान मंदिर जवळच्या शहरातील मध्यभागी नगरपालिकेच्या गांधी सागर तलावाच्या काठावर, लोकवस्ती असलेल्या समोरील कचºयाचे ढिगारे घालणाºयांवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित एच मेश्राम, रविंद्र महाकाळकर, स्वप्निल बडवाईक, अक्षय डोंगरे, अनिकेत गजभिये, योगेश चिंधालोरे यांनी नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. याठिकाणी नागरिकांना, प्रवाशांना, शालेय विद्यार्थ्यांना आणि वाहनचालकांना दुर्गंधीचा सामना करतच मार्गक्रमण करावे लागत आहे. याबाबत स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित एच. मेश्राम यांनी शिवसैनिकांसोबत तीन वर्षांपूर्वी नगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारा समोर पाच दिवसीय बेमुदत आमरण उपोषण केले होते. यामध्ये नगरपालिका हद्दीतील गांधी सागर तलावाभोवताल आवार भिंत तयार करावे, तलावाच्या गाळ काढून तलाव सौन्दर्यकरणं करण्यासाठी नगरपालिकेने डिटेल्स प्रोजेक्ट रिपोर्ट ( ऊढफ ) तयार करून शासनाच्या नगरविकास विभागाकडे पाठविण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती.

याप्रकरणी तत्कालीन मुख्याधिकारी विजय देशमुख यांनी लिखित आश्वासन देऊन मागण्या पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. मात्र तीन वर्षे लोटूनही, प्रशासकाकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही नगरपालिकेने कोणतीही ठोस भूमिका घेतली नसल्याने शहरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. तुमसर नगरपालिकेच्या वतीने नुकत्याच झालेल्या १ आॅक्टोबर २०२३ रोजी स्वच्छता हि सेवा कार्यक्रमा अंतर्गत स्वच्छ भारत अभियानामध्ये नगरपालिकेने शहरात स्वच्छता अभियानाविषयी जनजागृती करण्यासाठी गांधी सागर तलावाच्या काठावर स्वच्छता मोहीम राबवली होती. स्वच्छ अभियान संपताच पालिकेने कचरा टाकू नये, असे फलक लावलेल्या ठिकाणीच कचरा टाकल्याचे दिसून येत आहे. याकडे तुमसर नगरपालिका प्रशासनाकडून उपाययोजना होत नसल्याने स्थानिक नागरिकांच्या श्वास कोंडत असून स्वच्छ, सुंदर शहराच्या स्वप्नांचा चुराडा होत आहे. केंद्र शासनाच्या अमृत महोत्सव योजनेअंतर्गत गांधी सागर तलाव सौन्दर्यकरणं करण्यासाठी डिटेल्स प्रोजेक्ट रिपोर्ट ( ऊढफ ) बनवून ताबडतोब नगरविकास विभागाकडे सादर करण्याचे आदेश मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाºयांना दिले आहे तसेच तलावाच्या काठावर कचरा घालणाºयावर दंडात्मक कारवाई करण्याचे सूचना दिल्या.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *