घरटॅक्स कमी करण्याकरता निर्णय घ्या

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : नगर विकास संघर्ष समिती व मोहाडी शहरातील नागरीक सोमवार दि.३० आॅक्टोबर २०२३ ला खुशाल कोसरे, रफीक सैय्यद, पुरूषोत्तम पातरे, अनिल न्यायखोर, भीम बारई, आदर्श बडवाईक, सुभाष भाजीपाले, गणेश निमजे, विनोद नंदनवार, भुमेस्वर पारधी, मुस्ताक कुरेशी, श्याम चौधरी, अफरोज पठाण, राजू चोपकर, गणपत रायकवाड, गणेश सेलोकर यांच्या नेतृत्वाखाली पुढील मुद्द्यावर नगरपंचायतला निवेदन दिले. प्राप्त निवेदनानुसार, वाढलेल्या अवाजवी, भरमसाठ लावलेला घर टॅक्स वरून शहरातील नागरिकांमध्ये खूप मोठा रोष जाणवत होता. सभागृहात एकही नगरसेवक हजर नव्हते. योग्य प्रकारे वर्गवारी नुसार घर टॅक्स न आकारता, मनमर्जी प्रमाणे लावलेले मुख्य कर कमी करण्यात यावे. नगर पंचायत शिक्षणावर एक दमडीही खर्च करीत नसल्यामुळे, घर टॅक्स मधून निवासी/अनिवासी शिक्षण कर वगळण्यात यावे.मोहाडी नगर पंचायत मधे रोजगार हमी योजना सुरू नसल्यामुळे रोहयो कर रद्द करण्यात यावे. नगरपंचायत ने वृक्ष लागवड केली नसल्यामुळे वृक्ष कर वसूल करण्यात येवू नये. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी नगरपंचायत ने काही उपाय योजना केल्याचे कधीही निदर्शनास आले नाही. त्यामुळे पर्यावरण कर लावण्यात येवू नये.

अग्निशामक यंत्राचा लावलेला कर रद्द करण्यात यावे. घर टॅक्स बाबत आक्षेप घेण्याकरिता आॅफलाईन अर्ज स्वीकारण्यात यावे. सदर घर टॅक्स कमी करण्याबाबत ५ दिवसात नगरपंचायत ने योग्य तो निर्णय घेवून, घर टॅक्स कमी करण्यात आला नाही तर, नगर विकास संघर्ष समिती व मोहाडी शहरातील नागरीकांचा वतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात येईल व होणाºया परिणामाची सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहील याची नोंद घ्यावी. वरील निवेदन देतेवेळेस नितीन निंबारते, किशोर सोनवणे, शंकर बारई, पांडुरंग निखारे, निशांत कारेमोरे, राजकुमार मेहर, हेमत रतीराम मेहर, गोपीचंद मेश्राम, प्रकाश मारबते, ज्ञानेद्र आगाशे, विनोद बाभरे, रामनाथ पाटील, रोहित निमकर, सचिन नयायखोर, सुहास लांजेवार, लीलाधर धार्मिक, स्वस्तिक निमजे, तनोज देवदास गिरीपुंजे, गजानन डेकाते, धनराज डेकाटे, अजय वणवे, रमेश डेकाटे, तुषार गोन्नाडे, बाबा सैय्यद, रवींद्र मस्के, रफिक शेख, इनाम शेख, संतोष मारबते, लक्ष्मण पराते, भोलाराम साठवने, कादिर शेख, सुरेंद्र बारई, अशोक महादेव गभने, सेवानिवृत्त सैनिक, विठ्ठल गायधने, नरेश गायधने, गणेश चोपकर, रोशन नंदनवार, गणेश पात्रे, सोनू इलमकर, कैलाश खडोदे, दीपक पात्रे, राहुल हेडाऊ, अनिल टिचकुले, हंसराज नीमजे, विजय हेडाऊ, रवी पाटील, सलीम शेख, तन्मय त्रिभुवनकर, बंडू नीमजे, नारायण रंभाड, पुरूषोत्तम मारबते, सुरेश भजने, दिनेश मते, हिरामण सोनकुसरे, रामप्रसाद मानकर, तेजराम पराते, अकील शेख, रवी थोटे, जितेंद्र सोनकुसरे, विश्वनाथ डेकाटे प्रामुख्याने हजर होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *