आरोग्य शिबिराचा चारशे रुग्णांनी घेतला लाभ

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आंधळगाव सर्कलच्या वतीने बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ आंधळगाव येथे भव्य आरोग्य शिबिर शुक्रवार दि.१४ एप्रिल २०२३ ला बाळकृष्ण मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल राजीव गांधी चौक भंडाराचे तज्ञ डॉ.निकेश पंचभाई, डॉ.ईशांत कुरंजेकर, डॉ.पर्नवी कुरंजेकर, डॉ. तनया पंचभाई व साईस्किन केअर सेंटर यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आले होते. तर डॉ.गौतम डोंगरे, डॉ. प्रज्ञाशिल रोटगे, डॉ नीलिमा सपाटे यांनी सहकार्य केले. या निमित्याने अनेक रुग्णांची योग्यतपासणी करुन अनेक आजारांवर उपचार तथा मार्गदर्शन कण्यात आले. या आरोग्य शिबिराचा चारशे रुग्णांनी लाभ घेतला.
या प्रसंगी मोहाडी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेश हटवार, जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटिल, भंडारा जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस गजानन झंझाड, मोहाडी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय शहारे, जिल्हा परिषद सदस्य देवाभाऊ ईलमे, पंचायत समिती सदस्या दुर्गा बुराडे, माजी जिल्हा परिषद सदस्या वीणा झंझाड, जिल्हाकामगार काँग्रेसचे संघटन सचिव श्रीकांत येरपुडे, ओबीसी काँग्रेस कमिटी मोहाडीचे तालुका अध्यक्ष जयंत सोंनकुसरे, ग्रामपंचयत पाहुनीचे उपसरपंच रंजीत सेलोकर, नेहालचंद पाटिल, मनोहर बुराडे, विकास खराबे, भालचंद्र मारवाडे, राजू मते, हरिधर गोंडाने, मोहन उके, विलास गोंडाने, दूधराम नागोसे, दीपक चव्हाण, पिंटू बावणे, दिलीप सोनकुसरे, श्रीधर गभने, कैलाश मते, विकास चव्हाण, लोकेश चव्हाण, सोनू फुले, हिवराज चव्हाण, श्रीकांत चव्हाण, रोशन डोंगरे, पंकज उके, रुपेश धार्मिक, प्रतीक चव्हान तसेच समस्त ग्रामवासी उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे संचालन विनोद डोंगरे यांनी तर आभार अमित खोब्रागडे यांनी केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.