आंधळगाव पोलीस ठाण्यात होणार व्हिजिटर मॅनेजमेंट

तालुका प्रतिनिधी मोहाडी : तालुक्यातील आंधळगाव पोलीस स्टेशनमध्ये कामानिमित्त पोलीस ठाण्यात जाणाºया प्रत्येक व्यक्तीची छायाचित्रासह संगणकात नोंद व्हावी याकरिता भंडारा जिल्हा पोलीस दलातर्फे आंधळगाव पोलीस स्टेशन व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीमचे उद्घाटन विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांच्या हस्ते मंगळवार दि.२८ फेब्रुवारी २०२३ ला दुपारी १ वाजता पार पडले. प्रमुख अतिथी म्हणून भंडारा पोलीस अधीक्षक लोहित मतानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी रश्मीता राव एन पी, पोलीस निरीक्षक कापसे, तुमसरचे ठाणेदार नितीन चिंचोळकर, आंधळगावचे सहायक पोलीस निरीक्षक नितीनचंद्र राजकुमार, गोबरवाहीचे ठाणेदार मदनकर, ठाणेदार गोसावी, पोलीस उपनिरीक्षक गणेश पडवार हे होते.

महासंचालकांच्या आदेशाने राज्यातील सर्वच ठाण्यांत व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीम कार्यान्वित करण्यात येत आहे. यांतर्गत शहरातील व ग्रामिण भागातील पोलीस ठाण्यांत येणाºया प्रत्येक तक्रारदाराची नोंद घेण्यास सुरुवात झाल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांनी दिली. राज्यातील कोणत्याही ठाण्यात गेल्यानंतर प्रथम तेथील स्वागत कक्षातील काही पोलीस ठाण्यांत सध्या प्रायोगिक तत्त्वावर ही योजना सुरू झाली. तक्रार देण्याकरिता अथवा अन्य कोणत्याही कामासाठी पोलीस ठाण्यात येणाºया प्रत्येक व्यक्तीची माहिती जमा करण्याचे आदेश राज्य शासनाने पोलिसांना दिले आहे. त्यानुसार शहरातील व ग्रामीण भागातील सर्वच पोलीस ठाण्यांत आता स्वागतकक्ष उभारण्यात येत आहे.

याविषयी विशेष पोलीस महानिरीक्षक दोरजे म्हणाले की, व्हिजिटर मॅॅनेजमेंट सिस्टीमअंतर्गत हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या व्यक्तीची तक्रार घेण्यात आली अथवा नाही, पोलिसांकडून त्यांचे समाधान झाले अथवा नाही, याबाबतची नोंद होणार असून त्याची संपूर्ण माहिती आणि तक्रारींचे स्वरुप व तक्रारीचे काय झाले हे सर्व प्रकाराची माहिती एका कॉलममध्ये भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजय मोदनकर, अमोल मस्के, गणेश मते, मुकेश वैरागडे, सुदेश लांजेवार, विजेंद्र सिंगणजुडे, विजय मोदनकर, संजय वाकलकर, राकेश इंगोले, नामदेव बळदे, मंगेश शेन्डे, निरंजन खंगार, संदिप साठवणे, महेंद्र चोपकर, तृप्ती खोब्रागडे, देवराव वैद्य यांनी परिश्रम केले. पोलीस कर्मचाºयांकडे तुमचे नाव सांगावे लागेल. एवढचे नव्हे तर संगणकाशी जोडण्यात आलेल्या कॅमेºयाद्वारे तुमचे छायाचित्रेही घेतली जाणार आहेत. शहरातील

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *