मोटरसायकलच्या डिक्कीतून ७६ हजार पळविले

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : धानाचे जमा झालेले पैसे जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा साकोली येथून काढून पुंडलिक नारायण कापगते राहणार वलमाझरी यांनी ते पैसे गाडीच्या डीकीट ठेवले व पेट्रोल भरण्याकरता पेट्रोल पंपावर गेले त्यांच्या वर पाळत ठेवणाºयांनी पाठलाग करत अज्ञात इसमांनी पेट्रोल पंपावर त्यांच्या गाडीतून ७६ हजार रुपये पळवून नेण्याची घटना आज साकोली येथे दुपारी उघडकीस आली पुंडलिक नारायण कापगते वय ५५ वर्ष राहणार वलमाझरी यांनी धान शासकीय गोदामात जमा केला होता त्या ध्यानाच्या रकमेचे पैसे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक साकोली शाखेत त्यांच्या खात्यात जमा झाले आज रोजी बँकेतून ७६ हजार रुपये चेक द्वारे काढल्यानंतर कापगते हे आपल्या गाडी जवळ आले व मोटारसायकलच्या डिक्कीत पैसे टाकले परंतु गाडीच्या डिक्कीला झाकण नव्हते कापगते हे बँकेतून पैसे काढत असताना त्यांच्यावर अज्ञात इसम पाळत ठेवून होते.

एक वाजून दहा मिनिटांनी जेव्हा कापगते बँकेतून बाहेर आल्यानंतर आपल्या गाडीच्या डिक्कीत पैसे ठेवला नंतर त्यांनी गाडी पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपाकडे जाण्याकरिता वाढविली तेवढ्यातच त्यांच्यावर पाळत ठेवत असलेल्या एका आरोपीने पटकन गाडीतून गाडीतल्या डिक्कीतून नगदी रक्कम असलेला बॅग काढून दुसरा आरोपी मोटरसायकल चालू ठेवून विरुद्ध दिशेने उभा होता पहिल्या आरोपीने डिक्कीतून काढल्याबरोबर ते आरोपी आपल्या साथीदाराच्या मोटारसायकलवर बसून घटनास्थळावरून निघून गेला पुंडलिक कापगते यांनी पोलीस स्टेशन साकोली येथे तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून अज्ञात आरोपी विरुद्ध तपासाची चक्रे फिरवली आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *