सार्वजनिक उपक्रम विक्री करण्याचे सरकारचे धोरण

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : साकोली तालुक्यातील मुंडीपार येथे भेल चा कारखाना अद्यापही सुरू झाला नाही.कारखान्याकरीता दहा वर्षापुर्वी शेतकºयांच्या जमीनी अधिग्रहित केल्या. मात्र ना कारखाना उभा राहिला ना शेतकºयांना जमीनी परत केल्या.त्यामुळे राज्यातील डबल इंजिनचे सरकार कुठे पंक्चर झाले ते सरकारने सांगावे.कारखाना सुरू झाला असता तर जिल्ह्यातील अनेक बेरोजगारांचा रोजगाराचा प्रश्न सुटला असता.मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्व सार्वजनिक उपक्रम विक्री करण्याचे धोरण असल्याने भेलचा कारखाना सुरू होईल की नाही यात शंका आहे अशी टिका शिवसेनेचे नेते (उध्दव ठाकरे गट) खा. अरविंद सावंत यांनी केली. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्पेष्ठ शिवगर्जना अभियानाकरीता ते आज भंडारा येथे आले असता पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खा.सावंत पुढे म्हणाले की,जिल्ह्यात एकही अभियांत्रीकी तसेच वैद्यकीय महाविद्यालय नाही याचे नवल वाटते.भंडारा जिल्हा हा तलावाचा जिल्हा असल्याने येथे मस्त्यविद्यालय होणे गरजेचे आहे याकरीता राज्यातील डबल इंजिन सरकारने पावले उचलावित.जिल्ह्यात मोठया प्रमाणात मँगनीजच्या खाणी आहेत मात्र तेथे स्थानीकांना रोजगाराच्या संधी मिळत नाही.तिथे स्थानीकांना प्रथमत: रोजगार मिळाला पाहीजे याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.
तत्कालीन शिवसेनेचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी स्थानीक भूमीपुत्रांना उद्योगात प्राधान्य देण्याचे निर्देश दिले होते मात्र त्याची अमलबजावणी होतांना दिसत नाही.जिल्ह्यातील गोसे प्रकल्पबाधीतांचेअद्यापही पुनर्वसन झाले नाही आजही काही गावे पुनर्वसनापासुन वंचित आहेत.त्यांचे वेळीच पुनर्वसण होणे गरजेचे आहे. धान उत्पादक शेतकºयाना सरसकट मदत देण्याची घोषणा राज्यातील डबल इंजिन सरकारने केली होती मात्र दोन तीन दिवसाअगोदर सरकारने काढलेल्या आदेशामध्ये फक्त ईपिक नोंदणी किंवा तलाठी तसेच धान खरेदी केंद्रावर आॅनलाईन केलेल्या शेतकºयांनाच प्रोत्साहन निधी देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.सरकारचे हे धोरण शेतकºयांसाठी पुर्णपणे मारक असुन या आदेशामुळे भंडारा जिल्ह्यातील जवळपास सव्वा लाख शेतकरी मदतीपासुन वंचित राहणार असल्याने हे सगळे प्रश्न आपण शिवगर्जना अभियानाच्या माध्यमातुन जनतेसमोर मांडणार असल्याचे खा.अरविंद सावंत यावेळी म्हणाले.
केंद्र सरकारने सर्व पब्लीक सेक्टरचे खाजगीकरणाचा घाट घातला आहे. त्याकरीता सर्वसामान्य जनता मेली तरी चालेल.आपल्या उद्योगी मित्राच्या फायद्यांकरीता देशात खाजगीकरणाचा सपाटा चालविला आहे.राज्यात येवु घातलेले अनेक मोठे उद्योग हे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गुजरातला पळवुन नेल्याचे ही खा.सावंत यावेळी म्हणाले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *