सुभाष गायधने मोहाडी सहकारी शेतकी खरेदी विक्री समितीच्या अध्यक्षपदी अविरोध निवड

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : येथील डोंगरगाव रोडवरील असलेल्या मोहाडी सहकारी शेतकी खरेदी विक्री समिती मर्या.मोहाडी नोंदणी क्रमांक ६५४ ची निवडणूक रविवार दि.१२ मार्च २०२३ ला सकाळी ८ ते ४ वाजता सरस्वती महिला कनिष्ठ महाविद्यालय मोहाडी येथे निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद हुमणे व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संदीप निर्वाण यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली होती. यामध्ये वैयक्तिक गटामधून महादेव उरकुडा मोटघरे मोहाडी, जयंत वसंतराव वैरागडे डोंगरगाव, माधवराव तुळशीराम बांते कान्हळगाव, सुभाष रामाजी गायधने मोहाडी, रामप्रसाद मारोती बघेले सिहरी, जयश्री जयपाल गायधने, अनिता नरेश पोटफोडे नेहरूवार्ड मोहाडी, सहकारी संस्था मतदार संघातून बाळू बकराम बारई (३७) मोहाडी, किरण हरिभाऊ अतकरी (३४) जांब, रेवाराम ईस्तारी गायधने (२९) वरठी, ईतर मागासवर्गमधून प्रभाकर जानराव बारई (४८८) कान्द्री, अनुसूचित जाती/ जमातीमधून कमोद श्यामराव सरादे (५२२), भटक्या विमुक्त जाती/जमाती/विशेष मागास प्रवर्गमधून गिरधारी फागु खेडकर (५०२) डोंगरगाव विजयी झाले होते. गुरुवार दि.६ एप्रिल २०२३ ला घेण्यात आलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणूकित अध्यक्षपदी मोहाडी येथील सुभाष रामाजी गायधने तर उपाध्यपदी श्रावण सदाशिव कुथे यांची अविरोध निवड करण्यात आली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.