…तर तुमच्या वाहनाला समृद्धी महामार्गावर ‘नो एन्ट्री’

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : राज्याची भाग्यरेखा म्हणून समृद्धी महामार्गाकडे पाहिलं जातं. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये समृद्ध महामार्गावर होणाºया अपघातांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढली आहे. यातील बहुतांश अपघात हे टायर फुटल्यामुळे किंवा टायरशी संबंधित समस्यांमुळे झाल्याचं समोर आलं आहे. आता असे अपघात रोखण्यासाठी आरटीओकडून कडक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. जर तुमच्या वाहनाचे टायर्स योग्य स्थितीमध्ये नसतील तर तुम्हाला समृद्धी महामार्गावर प्रवेश मिळणार नाही. आरटीओकडून ‘नो एन्ट्री’ची कारवाई करण्यात येणार आहे.
तसेच जर वाहनाचे टायर सुस्थितीमध्ये नसेल आणि तरीही असे वाहन समृद्ध महामार्गावर प्रवास करताना आढळून आल्यास मोठा दंड वसूल केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. गुरुवारी अशा वाहनांचा प्रवेश रोखण्यासाठी मोटार वाहनकायद्यानुसार २० हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात आला आहे. समृद्धी महामार्गावर दिवसेंदिवस अपघाताची संख्या वाढत आहे. या वाढत्या अपघात घटनांच्या पार्श्वभूमीवर नुकतेच परिवहन उपायुक्त भरत कळसकर यांनी समृद्धी महामागार्ची पहाणी केली. पहाणीनंतर त्यांनी आरटीओ अधिकारी आणि एमएसआरडीसी च्या अधिकाºयांची संयुक्त बैठक घेऊन अपघात रोखण्याबाबत सूचना दिल्या होत्या. यानंतर हा निर्णय घेण्यता आला आहे.
आतापर्यंत २२ अपघात
समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी सुरू झाल्यापासून ते आजपर्यंत या महामार्गावर एकूण २२ अपघाताच्या घटना घडल्या आहेत. या अपघाताच्या घटनांमध्ये आतापर्यंत ३६जणांना आपाला जीव गमवावा लागला आहे. आता वाढत्या अपघाताला आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून पाऊलं उचलली जात आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *