महावितरणमध्ये सद्भावना दिवस साजरा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : भारताचे दिवंगत पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांची जयंती महावितरण कार्यालयात सद्भावना दिवस म्हणून साजरी करण्यात आली. याप्रसंगी महावितरणचे प्रादेशिक संचालक श्री सुहास रंगारी आणि नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री दिलीप दोडके यांनी स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी सर्व उपस्थित अधिकारी व कर्मचाºयांनी सद्भावना दिवसानिमित्त प्रतिज्ञा घेतली. याप्रसंगी अधीक्षक अभियंता सर्वश्री हरीश गजबे, राजेश नाईक, मंगेश वैद्य, उपमहाव्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान) श्री प्रमोद खुले,सहमुख्य औद्योगिक स्म्बंध अधिकारी, श्री मधुसुदन मराठे, महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) श्री अतुल राऊत, सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) श्री प्रदिप सातपुते, कार्यकारी अभियंता श्री समिर शेंद्रे, प्रणाली विश्लेषक श्री प्रविण काटोले, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री सचिन लहाने यांच्यासह महावितरणचे अधिकारी, अभियंते व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *