नागपुरातील व्यापाºयांची २० कोटींनी फसवणूक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : नागपूरमधील मोठे व्यापारी आणि त्यांच्या दोन मित्रांची शेअर्समध्ये हेराफेरी करून नफा मिळवून देण्याच्या नावाखाली २० कोटींची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी जुहू पोलिसांनी तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. जस्मिन शाह, दीपिका शाह आणि विशाल शाह अशी ट्रेडिंग कंपनी चालवणाºया आरोपींची नावे आहेत. तीनही आरोपी हे विलेपार्ले येथील रहिवाशी असून त्यांनी आतापर्यंत अनेक गुंतवणुकदारांची शेअर्स ट्रेडिंगच्या माध्यमातून फसवणूक केल्याची माहिती समोर आली आले. प्राप्त माहितीनुसार, नागपुरातील व्यावसायिक अभिनव रमाकांत फतेहपुरीया (४०) यांची सिल्वरस्टोन इंफ्रास्ट्रक्चर प्रा. लिमीटेड कंपनी आहे. त्यांच्या कंपनीतून ट्रेडिंग आणि गुंतवणूक करण्यात येते. त्यासाठी ते कमिशनवर काम करतात. अभिनव यांच्या कंपनीला आणि त्यांचे मित्र राहुल अग्रवाल, राजकुमार अग्रवाल यांनाही शेअर्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करायची होती. त्यामुळे त्यांनी एका ओळखीच्या व्यक्तीकडून जस्मिन शहा याच्याशी संपर्क साधला. जस्मिन शहा हा जे.एन. एम. रियालिटी ट्रेडिंग कंपनीशी संपर्क साधला. शहा याने दिपीका शाह आणि विशाल शहा यांच्याशी भेट घडवून आणली.

तिघांनीही रमाकांत आणि त्यांचे दोन मित्रांना शेअर्स ट्रेडिंगमध्ये चांगली गुंतवणूक करुन कोट्यवधीमध्ये नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी लाखोंमध्ये शेअर्स विकत घ्यावे लागणार असल्याचे सांगितले. त्यासाठी जस्मिन शहा यांच्या खात्यावर तिघांनीही २० कोटी ९० लाख रुपये वर्ग केले. त्यातून जस्मिन, दिपिका आणि विशाल शहा यांनी ७५ लाख ५० हजार शेअर्स विकत घेतले. त्या शेअर्सची किंमत २१कोटी ३२ लाख ८७ हजार रुपये एवढी आहे. ते शेअर्स खरेदी केल्याचा मॅसेज जस्मिन शहा याने रमाकांत यांच्या मोबाईलवर पाठवला. त्यामुळे तिघांचाही शहा याच्यावर विश्वास बसला. काही दिवसांपर्यंत शेअर्सचे भाव वाढल्यानंतर काही शेअर्सची विक्री केल्या जात होती आणि त्याबदल्यात नवीन कंपनीचे शेअर्सची खरेदी करण्यात येत होते. अशाप्रकारे रमाकांत यांना दर आठवड्याला काही मॅसेज येत होते. त्यामुळे त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. त्यांनी भाव वाढल्यानंतर शेअर्स विक्रीचे अधिकार शहा त्रिकुटांना दिले होते. त्याचाच गैरफायदा घेत त्रिकुटांना थोडे-थोडे शेअर्स विक्री करणे सुरु केले. गेल्या काही दिवसांतच त्यांनी सर्वच शेअर्स विक्री करीत रमाकांत फतेपुरिया, राहुल अग्रवाल आणि राजकुमार अग्रवाल यांची २० कोटींनी फसवणूक केली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *