महाशिवरात्रीनिमित्त मौदी ते आंभोरा नविन पुलावरुन पायदळ वाहतुक सुरु करा

भंडारा पत्रिका /प्रतिनिधी भंडारा : अवघ्या १० दिवसावर येवून ठेपलेल्या महाशिवरात्रीला आंभोरा येथील श्री चैत्यनेश्वर शिव मंदिरात दर्शन घेण्यासाठी भंडारा जिल्ह्यातील भक्तगण मोठ्या संख्येने जातात. करीता मौदी ते आंभोरा नविन पुलावरुन पायी जाण्यासाठी सदर पुलावरुन वाहतूक सुरु करावी अशी मागणी अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. गोसीखुर्द धरणाचे पाणी रोखल्याने मौदी (भंडारा) ते आंभोरा (नागपूर) जिल्हा अशा या दोन्ही जिल्ह्यांना जोडणारा महत्वाचा पुल वैनगंगा नदीवर मौदी ते आंभोरा येथे बांधकाम पुर्णत्वास आलेला असून उदघाटनाच्या प्रतिक्षेत आहे. महाशिवरात्री निमित्त नागपूर जिल्ह्यातील आंभोरा येथील श्री चैत्यनेश्वर शिव मंदिरात मोठी यात्रा भरते. यामुळे महाशिवरात्रीला अनेक जिल्ह्यातील भक्त भाविक हजारोच्या संख्येने सहभागी होतात. त्यामुळे त्यांना प्रवास करण्याकरिता मौदी ते आंभोरा पुलाचे रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाले असून ते उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. परंतु येत्या १८ फेब्रुवारी २०२३ ला महाशिवरात्र यात्रा असल्यामुळे ते अनेक भक्त भाविकांकरता तसेच अशा हजारो लोकांचे आंभोरा येथे येणेजाण्याकरिता सदर नविन पुलावरुन वाहतूक पायदळ जाणाºयांसाठी खुले करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघाचे राज्य उपाध्यक्ष संजीव भांबोरे व भंडारा तालुका अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघाचे अध्यक्ष कुलदीप गंधे, सामाजिक कार्यकर्ता विनोद वंजारी तसेच भंडारा जिल्ह्यातील समस्त भाविकांनी केलेली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *