‘आय एम सॉरी मम्मी’ असा मॅसेज करून विद्यार्थिनीची गळफास लावुन आत्महत्या

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर :-तालुक्यातील हसारा येथिल मातोश्री विद्या मंदिर तुमसर च्या ईयत्ता १२ व्या वर्गात शिकत असलेल्या विद्याथीर्नीने राहत असलेल्या घरी घराच्या छताच्या पंख्याला ओढनीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना ६ फेब्रुवारी रोजी सकाळी समोर आली. तनिष्का उर्फ निधी जितेंद्र पाटील (१७)रा हसारा असे आत्महत्या करणाºया विद्यार्थ्यांनीचे नाव आहे. मुळची कामठी येथील रहिवासी असलेल्या तनिष्काचे वडीलांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते.त्यामुळे ती हसारा येथे आपल्या मावशीकडे शिक्षण घेण्याकरीता राहत होती. व तुमसर येथिल मातोश्री विद्या मंदिर येथे ईयत्ता १२ व्यावर्गात विज्ञान शाखेत शिकत होती.सध्या १२ व्या वर्गाचे विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक पेपर सुरु आहेत. तनिष्काचे सुध्दा प्रात्यक्षिक पेपर सुरु असतांना आपल्या मोबाईलवरून कामठी येथे राहत असलेल्या आपल्या आईला आय एम साँरी .. लव यु मम्मी..असा मँसेज फाँरवर्ड करुन ५ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास हसारा येथे मावशी कडे राहत असलेल्या घरी छताच्या पंख्याला स्वत:च्या ओढनीने गळफास लावुन आत्महत्या केली. घटनेच्या दिवशी तनिष्काच्या मावशीने झोपेतुन आतापर्यंत उठली का नाही. म्हणुन तिच्या खोलित खिडकीतून डोकावून बघितले असता तनिष्का छताच्या पख्याला ओढनीने गळफास लावलेल्या स्थितीत आढळुन आल्यानेतिच्या मावशिने एकच हंबरडा फोडला. सदर घटनेची माहीती गावात होताच घटनास्थळी येथिल नागरीकांनी एकच गर्दी केली होती. १२ व्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सदर घटनेची नोंद तुमसर पोलीसांत करण्यात आली असून पूढील तपास ठाणेदार नितिन चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कुंभरे करीत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *