महामार्गावरील बॅरिकेट्समध्ये अडकले हरिण

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : न्यू नागझिरा नवेगाव बांध कोका अभयारण्याच्या विस्तारीकरणामुळे दिवसेंदिवस वन्य प्राण्यांची धाव लोकवस्तींकडे वाढत असून वन्य प्राणी राष्ट्रीय महामार्गावर तसेच गावात शहरात वावर करीत असल्याचे दिसत आहे. आज साकोली येथील राष्ट्रीय महामार्गावरील सेंदुरवाफा परिसरात मामा मशिनरी समोरील महामार्गावर लागलेल्या लोखंडी बॅरिकेटमध्ये हरिण अडकले होते. या हरीणीला शेंदूरवाफा येथील नागरिकांनी सुरक्षित रित्या काढून पकडून महामार्ग ओलांडत असताना महामार्गावर लागलेल्या बॅरिकेट्स मध्ये अडकली होती.

वन्यजीव विभागाच्या आरआरटी पथक व नागरिकांच्या मदतीने हरिणला नागझिरा नवेगाव बांध उपसंचालक कार्यालयात नेण्यात आले. डॉक्टर चचाने यांनी उपचार करून हरणीला नागझिरा जंगलात सुरक्षितरित्या सोडण्यात आले. मागील काही दिवसापूर्वी राष्ट्रीय महामार्गावर वाघाचा वावर, तसेच मुंडीपार सडक नजीक बिबट्याचा अपघाती मृत्यू, तर लाखनी शहरातील वर्दळीच्या ठिकाणी सिंधी लाईन मधील ठेवले व वन्यजीव विभाग व वन एका कापड दुकानात हरीण शिरल्याची विभागाला माहिती देण्यात आली. उपस्थित नागरिकांनी सांगितले की, कुत्र्यांच्या पाठलागामुळे हरीण राष्ट्रीय घटना, असे अनेक प्रकार घडत असल्याने वन्यजीव धोक्यात आल्याचे चित्र आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.