ओबीसींसाठी लोकसभा, विधानसभेत स्वतंत्र मतदार संघ करा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर: राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे आठवे राष्ट्रीय अधिवेशन महती आॅडिटोरियम बालाजी कॉलनी, तिरूपती, आंध्र प्रदेश येथे ७ आॅगस्टला आयोजित करण्यात आले आहे. याप्रसंगी केंद्र सरकारकडे ओबीसींसाठी लोकसभा, विधानसभेत स्वतंत्र मतदार संघासह एकूण ४२ मागण्या केल्या जाणार आहेत, अशी माहिती महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी दिली. प्रेस क्लबमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत तायवाडे म्हणाले, अनुसूचित जाती, जनजातीच्या धर्तीवर ओबीसींनाही राज्यातील सर्वच शाखांमध्ये आरक्षण द्या, जातनिहाय ओबीसींची जनगनना करा, ओबीसींच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अर्थसकल्पात तरतुद करा, जुनी पेन्शन तात्काळ लागू करा, सर्वोच्च न्यायालयाने घातलेली ५० टक्के आरक्षणाची मयार्दा दूर करण्यासाठी घटनादुरूस्ती करा, ओबीसींच्या मुलेमुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह करा, ओबीसी शेतकºयांना वयाची साठी ओलांडल्यावर पेंशन लागू करा याइतरही ४२ मागण्या आम्ही करणार आहोत.

ओबीसी महासंघ तयार झाल्यापासून केंद्र व राज्य शासनाने तब्बल ३३ वेगवेगळे शासन निर्णय घेतले. याही मागण्या पूर्ण करण्यासाठी केंद्र व राज्यस्तरावर प्रसंगी आंदोलन केले जाईल, असेही डॉ. तायवाडे म्हणाले. ओबीसींसाठी आता स्वतंत्र गृहनिर्माण योजना सुरू होणार असून त्यातून १० लाख कुटुंबांना घरे मिळणार असल्याचेही त्यानी सांगितले. ओबीसींच्या तिरूपतीतील अधिवेशनाला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांच्यासह देशविदेशातील ओबीसींचे मोठे नेते, विविध पक्षातील पदाधिकारी व विविध क्षेत्रातील महत्वाची व्यक्ती उपस्थित राहणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. पत्रकार परिषदेला महासंघाचे सचिन राजूरकर, शरद वानखेडे, गुनेश्वर आरीकर, परमेश्वर राऊत, ऋषभ राऊत, सुषमा भड, रेखा बाराहाते उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *