पावसाळयामुळे विमान प्रवासी घटले

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन दररोज ३४ विमानांचे उड्डाण होत आहे. सततच्या पावसाळयामुळे विमान प्रवास करणारे ३० टक्कयांनी कमी झाले असून याचा फटका विमान कंपण्यांना बसला आहे. नागपूर विमानतळावरुन सर्वाधिक ८ विमाने मुंबईकरिता तर त्यानंतर दिल्ली, पुणे, कोलकाता, चेन्नई, अहमदाबाद, लखनौ, इंदूर, गोवा, बेळगाव करीता फ्लाइट उपलब्ध आहे. याशिवाय नागपूर विमानतळावरुन शारजाह व दोहाला जाण्यासाठी फ्लाइट आहे. यात सर्वाधिक उड्डाणे इंडिगो कंपणीची आहेत. सततच्या पावसाळयामुळे विमान प्रवास करणारे कमी झाल्यास विमान कंपन्यांकडून आॅफरची घोषणा होत असते. मात्र १५ आॅगस्टनंतर पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पुन्हा विमान प्रवास करणारे प्रवासी वाढत असतात. हा क्रम असाच दिवाळीपर्यंत असतो. दसरा ते दिवाळी दरम्यान तिकीट उपलब्ध नसल्याने तिकीटांचे दर वाढलेले असतात. नागपूर विमानतळावरून प्रवास करणारे प्रवासी हे नागपूरसह लगतच्या जिल्हयातील असतात.

मुख्यत: नागपूरच्या विमानतळावरुन नियमित प्रवास करणाºया प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, सण उत्सवाच्या दरम्यान विमान कंपन्यांकडून तिकीट दर वाढविले जाते. तर पावसाळी वातावरणात प्रवासी संख्या कमी असल्याने आॅफर दिल्या जाते. यात विमानाच्या तिकीट दरात कपात केल्या जात असते. संपूर्ण जुलै महिन्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने प्रवासी संख्या कमी असते. हीच गॅप भरुन काढण्यासाठी काही कंपन्यांकडून आॅफर देत प्रवास भाडे कमी केल्या जात असते. दरम्यान कोणत्याही कंपण्यांनी अद्याप आॅफर जाहीरकेलेली नसली तरी तिकीट दर कमी असल्याची माहिती प्रवाशांनी दिली आहे. उन्हाळातील सुट्टयांमध्ये विविध शहरात जाणारे प्रवासी सर्वाधिक असतात. अशा वेळी मुंबई, दिल्ली, पुणे,बंगळुरु, हैदराबाद, चेन्नईसह अन्य ठिकाणचे प्रवास भाडे दुप्पट असते. सध्याच्या घडीला विमान भाडे ५ ते ६ हजार रुपयांपर्यंत आहे. एकीकडे विमान प्रवास करणारे प्रवासी वाढल्याने विमानांची संख्या वाढली आहे. अनेक प्रवासी आॅनलाइन तिकीट बुकींग करुन कमी दरात प्रवास करीत असतात. तर काही प्रवासी खाजगी एजंटकडून तिकीट बुकींग करीत असतात. यात मुंबई, दिल्ली, पुणे, बंगळुरु, हैदराबादचे आॅनलाईन तिकीट १५ दिवसांपूर्वीच काढल्यास प्रवास भाडे कमी पडते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *