मनोहर भिडे च्या महात्मा गांधी विषयी आपत्तीजनक विधानाचा उत्तर नागपूर कॉंग्रेस तर्फे निषेध

प्रतिनिधी नागपूर : मनोहर भिड़े ने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बद्दल केलेल्या आपत्तीजनक विधानाचा आज माननीय डॉ. नितीन राऊत माजी मंत्री तथा विद्यमान आमदार यांच्या मार्गदर्शनात उत्तर नागपूर काँग्रेस तर्फे निषेध करण्यात आला. भिड़े याने अनैतिहासिक आणि अवैज्ञानिक विधान करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. उत्तर नागपूर काँग्रेसच्या वतीने यावेळी मनोहर भिडे च्या विरोधात नारेबाजी करण्यात आली. भिडे यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन यावेळी करण्यात आले. महात्मा गांधी यांचे या देशासाठी मोठे योगदान असून जगात भारताची ओळख ही महात्मा गांधी यांच्यामुळे आहे. त्यांच्या विचारांचा सन्मान सारे जग करत असताना मनोहर भिडे सारखे व्यक्ती जातीय सलोखा नासवण्यासाठी असे विधान करतात अशी भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. सरकारने त्यांच्या या विधानाची गंभीरपणे दखल घेऊन तत्काळ कार्यवाही करावी अशी मागणी यावेळी उत्तर नागपूर काँग्रेस तर्फे करण्यात आली.

यावेळी नागपूर शहर कॉंग्रेस कमिटी उपाध्यक्ष श्री बंडोपंत टेंभुर्णे, ब्लॉक अध्यक्ष दिपक खोब्रागडे, माजी नगरसेवक सुरेश जग्यासी, माजी नगरसेवक दिनेश यादव, रामाजी उईके, गौतम अंबादे, अ‍ॅड, जितेंद्र वेळेकर, चेतन तरारे, सचिन डोहाने, संदीप सहारे, मुन्ना पटेल, दिनेश साधनकर, कृष्णा गजभिये, सादिक अली, अनिरुद्ध पांडे, अजय वंजा- री, प्रशांत पाईक, दिपक गजभिये, विजयालक्ष्मी हजारे उत्तर नागपूर महिला कॉंग्रेस अध्यक्षा कल्पना द्रोणकर, रेखा लांजेवार, शालिनी सोनटक्के, पूजा कौर बाबरा, सीमा साखरे, रंजना मेश्राम, चंद्रकला सोमकुंवर, प्रमिला जनबंधू, विना दरवाडे, सुवर्णा चालखुरे, सावित्री राऊत, अरुणा कापसे, विद्या देशभ्रतार, सीमा साखरे, सुरेखा भोवते, दिपा गावंडे, ज्योती पांचभाई, अरुणा गडपाले, सुषमा लोखंडे, वैशाली इंगळे, रिता मेश्राम, शालू उडाखे, अल्का डोंगरे, शारदा रामटेके, कांचन कापसे, राजश्री पाटील, प्रभा साखरे, मालाबाई फुलके, मनोरमा राऊत, वंदना बोदेले व मोठ्या संख्येने इतर उत्तर नागपूर काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *