टायगर मास्क मेकिंग, टायगर ड्रॉइंग व टायगर फेस पेंटिंग स्पर्धाचे आयोजन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखनी : ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबच्या पुढाकाराने वनविभाग लाखनी, नेफडो विभागीय वन्यजीव समिती नागपूर व गुरुकुल आय टी आय तसेच अभा अंधश्रद्धा निर्मूलन समिती तालुका शाखा लाखनी, जिल्हा शाखा भंडारा तर्फे हा कार्यक्रम गुरुकुल आय टी आयच्या प्रांगणात आयोजित केला. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीमध्ये लाखनीचे वनक्षेत्रसहाय्यक जे. के. दिघोरे, ग्रीनफ्रेंड्सचे कार्यवाह प्रा.अशोक गायधने, ग्रीनफ्रेंड्सचे पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक मंगल खांडेकर, लाखनी बिटरक्षक त्रिवेणी गायधने, रामपुरी बिटरक्षक दिनेश बोरकर, बिटरक्षक गडेगाव मंगला शहारे, बिटरक्षक मुरमाडी तुपकर अश्विनी रंगारी, गुरुकुल ट्यूशन व स्पर्धा क्लासचे संचालिका दीपिका चकोले मॅडम, वाईल्ड रेस्क्यूअर सर्पमित्र मयुर गायधने, नितीन निर्वाण, दर्वेश दिघोरे, खेमराज हुमे, निलेश रहाटे, सेवानिवृत्त माजी सैनिक कुंभरे, गुरूकुल आयटीआयचे जयश्री मेश्राम, डुंभरे सर इत्यादी उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गुरुकुल आयटीआयचे प्राचार्य खुशालचंद्र मेश्राम उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरवात प्रमुख अतिथींच्या हस्ते वड रोपाचे वृक्षपूजनाद्वारे करण्यात आली. त्यानंतर सर्व प्रमुख अतिथींना वृक्षरोपे देऊन स्वागत करण्यात आले. टायगर मास्क मेकिंग स्पर्धेत राणी लक्ष्मी विद्यालयातील हायस्कुल गटातून लाचू कुथे ला प्रथम तर चेतना कुथे हिचा द्वितीय क्रमांक आला आणी मिडलस्कुल गटातून केशवी मेश्राम, नोमेश्वरी झंझाड, नेहा भोवते, खुशबू लांजेवार, संचिता भांडारकर, नोमेश्वरी झंझाड यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक प्राप्त झाला. गुरूकुल ट्युशन क्लासचे विद्यार्थीनी युनिव्हर्सल इंग्लिश स्कुलची निधी खराबे तर लिटिल μलॉवर इंग्लिश स्कुलचे विपुल वंजारी, सोहम वंजारी, निखिल मुटकुरे, नियती बेलखोडे, मिहाल वासनिक, हार्दिक अंबादे, शर्वरी गायधने, याशी वंजारी, तेजस्विनी देशमुख, छोटी डुंभरे यांनी सुद्धा उत्कृष्ट प्रयत्न करीत टायगर मास्क मेकिंग, टायगर ड्रॉइंग व टायगर फेस पेंटिंग स्पर्धेत प्रथम तीन क्रमांक मध्ये स्थान पटकावले.

यानंतर सर्पमित्रांनी ‘टायगर डे च्या निमित्ताने विविध ठिकाणी पकडलेले विषारी नाग व पट्टेरी मण्यार दाखवून या सापांविषयी अंधश्रद्धा, गैरसमज दूर करण्यात आले. टायगर डे कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन कानेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिद्धिविनायक हॉस्पिटलचे संचालक डॉ.मनोज आगलावे, नितीश नगरकर, नेताराम मस्के, इंजि. राजेश गायधनी, नगरसेवक संदिप भांडारकर, गुरुकुल आय टी आय प्राचार्य खुशालचंद्र मेश्राम, जयश्री मेश्राम, शिक्षिका निधी खेडीकर, सर्पमित्र मयुर गायधने, खेमराज हुमे, नितीन निर्वाण, दर्वेश दिघोरे, निलेश रहाटे, डुंभरे सर, कानेकर सर यांनी तसेच वनविभाग लाखनीचे वनक्षेत्राधिकारी सुरज गोखले यांनी अथक परिश्रम घेतले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *