माजी मंत्री सुनील केदार सह सहा जण जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी दोषी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : काँग्रेसचे नागपूर जिल्ह्यातील दिग्गज नेते तथा माजी मंत्री सुनील केदार यांना नागपूर जिल्हा सहकारी बँक घोटाळा प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरविले आहे. शुक्रवारी सकाळी जिल्हा न्यायालयाने हा निर्णय सुनावला. केदार यांना किती शिक्षा मिळणार याबाबत सायंकाळी ४:१५ वाजता न्यायाधीश निर्णय सांगतील. सुनील केदार हे या प्रकरणात मुख्य आरोपी आहेत. २००१-०२ दरम्यान हा घोटाळा झाला तेव्हा केदार बँकेच्या अध्यक्षस्थानी होते. घोटाळ्यातील आरोपींमध्ये सुनील केदार, बँकेचे तत्कालीन महाव्यवस्थापक अशोक नामदेव चौधरी, तत्कालीन मुख्य हिशेबणीस सुरेश दामोदर पेशकर, रोखे दलाल केतन कांतीलाल सेठ, सुबोध चंदादयाल भंडारी, नंदकिशोर शंकरलाल त्रिवेदी, अमित सीतापती वर्मा, महेंद्र राधेश्याम अग्रवाल, श्रीप्रकाश शांतीलाल पोद्दार यांचा समावेश आहे. इतर दोन आरोपींपैकी रोखे दलाल संजय ह-ि रराम अग्रवाल यांच्याविरुद्धच्या खटल्यावर मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे तर कानन वसंत मेवावाला फरार आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *