जयंती कठाळे यांना अन्नपूर्णा सरस्वती पुरस्कार प्रदान

प्रतिनिधी नागपूर : महिला समाज रामनगर, सरस्वती मंदिर स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने विविध क्षेत्रात उत्तम कार्य करणाºया महिलेस प्रत्येक महिन्यात सरस्वती पुरस्कार प्रदान येतो. या महिन्यात पूर्णब्रम्हच्या जयंती कठाळे यांना अन्नपूर्णा सरस्वती पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी वर्षा कौशिक यांनी अन्नपूर्णा स्तोत्र म्हटले. यावेळी अध्यक्ष स्थानी पाककला तज्ञ रोहिणी देशकर उपस्थित होत्या. अन्नपूर्णा सरस्वतीपुरस्कार प्रदान केल्यानंतर प्रभा देउस्कर यांनी जयंती कठाळे यांची प्रकट मुलाखत घेतली. यातून त्यांनी ‘पूर्णब्रम्ह’च्या प्रवासाची ओळख करून दिली. नऊवार साडी ही त्यांची विशेष ओळख आहे. सात दिवस सात विविध थाळ्या हे त्यांच्यापूर्णब्रम्हचे वैशिष्ट्य आहे. अन्न हे पूर्णब्रह्म आहे त्याची अजिबात नासाडी होऊ नये, यासाठी त्यांनी विशेष सूट उपलब्ध करून दिली आहे.लवकरच नागपुरात देखील पूर्णब्रम्हचा शुभारंभ करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

भारतीय संस्कृतीची जपणूक करणे, हा जयंती कठाळे यांचा मुख्य उद्देश आहे. यावेळी मिलेट ‘श्री धान्य’ ज्वारी आणि नाचणी यापासून खारा आणि गोड पदार्थ यांची स्पर्धा आयोजित करण्यात आली. खारा पदार्थ करण्यात वंदना शेंडे या प्रथम, रमा फूकेया द्वितीय आणि रश्मी रानडे यांना तृतीय पारितोषिक मिळाले. गोड पदार्थ करण्यात प्रथम क्रमांक माणिक सावळापूरकर, द्वितीय मुग्धा भावे तर तृतीय भारती वीसावल यांना मिळाला. उत्तेजनार्थ वनमाला क्षीरसागर आणि नंदा अहिर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे प्रायोजकत्व इनर व्हील यांनी केले. सर्व सहभागींना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनुराधा कुºहेकर यांनी केले तर सूत्रसंचालन अंजली पारनंदीवार यांनी केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.