विधिमडळात पवशावर निबध

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या १० व्या दिवशी लोकसभेचे कामकाज सुरू असताना दोन अज्ञात व्यक्तींनी प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उड्या मारल्या. खासदारांच्या बाकांवरून उड्या मारत हे दोघेजण लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीच्या दिशेने धावत होते. या घटनेचे तीव्र पडसाद आज विधिमंडळात उमटले. विधानसभा अध्यक्षांनी यापुढे आमदारांना दोनच पासेस देण्यात येईल असे घोषित केले. तर विधानपरिषदेत उपसभापती डॉ. निलम गोºहे यांनी अभ्यागतांच्या प्रवेशावरून पूर्णत: बंदी घातली. नागपूर येथे महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनादरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी संसदेतल्या सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा विधानसभेत मांडला. तसेच आपणही काळजी घ्यायला हवी असे त्यांनी अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांना सांगितले. त्यावर विधानसभा अध्यक्ष नार्वेकर म्हणाले, मीसुद्धा वारंवार सर्व सदस्यांना विनंती केली आहे की आवश्यक असतील तेवढेच व्हिजीटर्स पास काढून घ्या. कोणीही अधिक पासेसची मागणी करू नका. विधानसभा अध्यक्षांच्या प्रतिक्रियेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील हाच मुद्दा मांडला.तसेच पवार म्हणाले, माझी विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेच्या सभापतींना विनंती आहे की, आपण विधीमंडळाचे पासेस कमी करायला हवेत.

अजित पवार यांच्या मागणीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, मी जाहीर करत आहे की आजपासून प्रत्येक आमदाराला जास्तीत जास्त दोन पासेस दिले जातील. त्याव्यतिरिक्त तिसरा पास दिला जाणार नाही.विधान परिषदेच्या गॅलरीत या अधिवेशनात अभ्यागतांना प्रवेश देऊ नये असे निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोºहे यांनी दिले आहेत. दरम्यान ही घटना कारणावर आल्यानंतर सभागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेचा तत्काळ आढावा घेण्यात आला. तसेच उपस्थित सुरक्षा रक्षकांना कडेकोट तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ही घटना गंभीर आहे. विधान परिषदेतील गॅलरी पासेस आजपासून बंद करण्यात येत आहेत. अभ्यागतांना सभागृह गॅलरीत प्रवेश मिळणार नाही. आमदारांनी पासेसबाबत पत्र जारी करू नये असे निर्देश उपसभापतींनी दिले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *