दादासाहेब कन्नमवारांचे कार्य दिशादर्शक – प्रभाताई चिलखे

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : बहुजन नायक म्हणून मा. सा कन्नमवार यांचे कार्य अद्वितीय असून अनेकांना जगण्याची उमेद देणारे आहे. माणूस परिस्थितीने हरला तरी भविष्याच्या उमेदीने विश्वासपूर्वक उभा राहिला तर नक्कीच यशस्वी होतो. कन्नमवारांनी प्रत्येक कार्य आव्हान म्हणून स्विकारले म्हणून अपयश कधी प्राप्त झाले नाही. त्यामुळे प्रत्येकाने कन्नमवारांपासून प्रेरणा घेऊन जीवन जगावे असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रभाताई चिलखे यांनी केले. नागपूर विधानभवन परिसरात बेलदार समाज संघर्ष समितीतर्फे माजी मुख्यमंत्री कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांची ६० वी पुण्यतिथी आज (ता २४) साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रभाताई चिलखे उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून श्री कैलास पाझारे कक्ष अधिकारी विधान भवन, श्री अभिजीत कुचेवार कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग, श्री रवि आकुलवार, श्री उल्हास जंगीटवार, श्रीमती स्नेहलता खोब्रागडे कक्ष अधिकारी विधानभवन उपस्थित होते. प्रथमत: दादासाहेब कन्नमवार यांच्या पुणार्कृती पुतळ्याला व प्रतिमेला पुष्पहार घालून मार्ल्यापण करण्यात आले.

यावेळी उपस्थितांनी दादासाहेब कन्नमवार यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करुन त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन बेलदार समाज संघर्ष समितीचे अध्यक्ष श्री राजेंद्र बढिये यांनी केले. तर आभार श्री प्रकाश बमनोटे यांनी मानले. कार्यक्रमात श्री खिमेश बढिये, श्री अण्णाजी गुंडलवार, श्री मुकुंद अडेवार, श्री विनोद आकुलवार, श्री दिनेश गेटमे, श्री तुषार रागीनवार, श्री किशोर सायगन, श्री प्रेमचंद राठोड, श्री प्रकाश भोयर, श्री राजू जाजुलवार, श्री रमेश चिमनवार, श्री राजू फेद्देवार, श्री संजय माटे, श्री रुपेश कुचेवार, श्री सुनील दुम्पलवार, श्री विजय कोपुलवार, श्री अनील जंगीटवार, सौ सोनाली कोपुलवार, श्री सुनील कोपुलवार, डॉ विजय बोरगमवार, श्री सुधीर ताटेवार, सौ स्वाती अडेवार, श्रीमती ललिता मामीडवार, श्रीमती अर्चना कोट्टेवार, सौ सुषमा पारकर, सौ रुपाली क्षिगीरवार, सौ रोशनी कोट्टेवार, सौ सोनाली कोपुलवार, श्रीमती नंदा पत्तीवार, सौ स्नेहल गुंजेवार, सौ प्रिती इलमुलवार यांच्यासह बेलदार समाज बांधव व भटक्या विमुक्त चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *