महावितरणच्या वीज चोरीविरुद्धच्या मोहिमेत १० दिवसात २२० जणांविरुद्ध कारवाई

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : महावितरणच्या वतीने मागील १० दिवसांत राबविण्यात आलेल्या वीज चोरी विरुद्धच्या विशेष मोहिमेत २२० जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली. शुक्रवारी प्रादेशिक संचालक सुहास रंगारी व मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी स्वत: शहरातील अनेक भागात भेटी देऊन या मोहिमेत सहभाग घेतला व मोहीम आणखी तीव्र करण्याचे निर्देश दिले. महावितरणच्या वतीने २ नोव्हेंबर पासून शहरातील विविध भागात वीज यंत्रणेची तपासणी करण्यात येत आहे. या तपासणी अंतर्गत मीटर, वीज खांबापासून मीटर पर्यंतची वायरींग याची विशेष तपासणी करण्यात येत आहे. या तपासणी अंतर्गत मागील १० दिवसात एकूण २२० वीज चोरीची प्रकरणे आढळून आली. त्यांच्या विरोधात वीज कायद्यांअंतर्गत कारवाई करण्यात येत आहे. नागपूर शहरातील यशोदा नगर,समता नगर,आझाद कॉलोनी,ठाकूर प्लॉट,आदर्श नगर ,बीडीपीठ,शांती नगर,दही बाजार, राजीव गांधी नगर, कळमना, वांजरा,नाईक पुरा, महाल, मोमीनपुरा, चुडी गल्ली, कब्रिस्तान रोड, गांधीबाग खदान,निराला सोसायटी,यशोधरा नगर, इंदोरा झोपडपट्टी,कसाब पुरा,टोपरी विहीर, दादरा पूल इत्यादी भागात मोहीम राबविण्यात आली.महावितरणचे अभियंते व जनमित्रांसह सुरक्षा व दक्षता विभागाच्या वतीने ही मोहीम राबविण्यात येत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *