भूमिगत गटार योजनेचे भूमिपूजन म्हणजे स्वप्नपूर्ती : खा.सुनिल मेंढे

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : नगर परिषदेचा नगराध्यक्ष म्हणून काम करताना पाच वर्षाच्या काळात विकासाला वाट मोकळी करून देण्याचा प्रयत्न मी केला. भूमिगत गटार योजना त्यातीलच एक स्वप्न होते. आज झालेले भूमिपूजन हे स्वप्नपूर्तीच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. भविष्यातही भंडारा शहर आणि जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने आपणं खंबीरपणे आमच्या पाठीशी असाल, अशी अपेक्षा खासदार सुनिल मेंढे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भंडारा जिल्ह्यात आले होते. यावेळी त्यांच्या जाहीर सभेचे आयोजन भंडाºयात करण्यात आले. त्यापूर्वी गोसीखुर्द प्रकल्पाची पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली. या पाहणीच्या वेळी खासदार सुनिल मेंढे यांनी उपस्थित राहून पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करण्याच्या दृष्टीने नियोजन केले जावे अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली. दरम्यान जाहीर सभेत बोलताना खासदार सुनील मेंढे यांनी, नगराध्यक्ष म्हणून पाच वर्षे केलेल्या कामाची पोचपावती जनतेने दिली. विकासाची दिशा ठरवून जे जे नियोजन केले ते तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तडीस नेले.

भूमिगत गटार योजना त्याच प्रयत्नांपैकी एक होती. आज त्याचे उद्घाटन होत आहे, क्षण अत्यंत आनंदात असल्याचे ते म्हणाले. निर्णय घेण्यात तत्परता आणि विकासाची दुर्दृष्टी असलेले मुख्यमंत्री म्हणून आपली ओळख आहे त्यामुळे या जिल्ह्याच्या आणि शहराच्या विकासासाठी आपन काहीही कमी पडू देणार नाही अशी आशा आम्हाला आहे. या भागाचा खासदार म्हणून काही अपेक्षा आपणाकडून आहे. भंडारा शहरातील नगर परिषदेची प्रशस्त इमारत तयार व्हावी म्हणून २० कोटीचा निधी शासनाने मंजूर करावा, भंडारा शहरालगत असलेल्या वैनगंगेच्या तट- ावर सौंदर्य करण्यासाठी १५ कोटीचा निधी द्यावा, शहरातील अग्निशमन व्यवस्था अत्याधुनिक करण्यासाठी निधी देण्यात यावा, साकोली नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीसाठी निधी व पाणीपुरवठा योजेनला मान्यता देण्याच्या दृष्टीने निर्णय घ्यावा, गोंदिया जिल्ह्यातील पांगोली नदीच्या पुनर्जीवनासाठी १०० कोटीच्या निधीची तरतूद करून जिल्ह्यात जलक्रांतीच्या दिशेने एक पाऊल टाकण्याच्या दृष्टीने सहकार्य करावे अशा मागण्या यावेळी खासदार सुनील मेंढे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात या गोष्टींचा उल्लेख करीत कुठल्याही कामासाठी निधी कमी पडू देणार नाही असे सांगितले. हे सरकार लोकांच्या पाठीशी खंबीरपने उभे असल्याचे ते म्हणाले, पर्यटनाच्या माध्यमातून विकास या मुद्यावरही मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक मत मांडले. यावेळी मंचावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार कृपाल तुमाने, आमदार आशिष जैस्वाल, डॉ.परिणय फुके, नरेंद्र भोंडेकर, विजय रहांगडाले, किशोर जोगरेवार, शिशुपाल पटले, प्रदीप पडोळे, चैतन्य उमाळकर व आदी मान्यवर उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *