सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात रुपेश टांगलेंचा सक्रिय सहभाग

गोवर्धन निनावे/भंडारा पत्रिका भंडारा : आजच्या काळात कोणत्याही शहरात किंवा गावात झोलाझेंडी समाजसेवकांची कमी नाही आहे. पण काही समाजसेवक असेही असतात, जे कोणतीही अपेक्षा न ठेवता लोकांसाठी रात्रंदिवस धावतात व मदत करतात, मात्र लोकांची मनोभावे मदत करुनही कसलाही श्रेय घेत नाहीत. असाच लोंकांची कोणतेही उद्देश न ठेवता एका शब्दावर सर्वांसाठी धावणारा खराखुरा समाजसेवक भंडारा शहरात नावालौकिकास आला आहे, आणि तो म्हणजे युनिव्हर्सल स्पोर्ट फाउंडेशन भंडाराचे अध्यक्ष रुपेश टांगले असे त्यांचे नाव आहे. त्यांनी आज पर्यंत युनिव्हर्सल स्पोर्ट फाउंडेशन च्या माध्यमातुन भंडारा जिल्ह्यात विविध सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रामध्ये स्वखर्चातून गरजूंना मनोभावे मदत केली आहे. समाजसेवक रुपेश टांगले यांनी युनिव्हर्सल स्पोर्ट फाउंडेशन ची स्थापना २००८ साली केली व या फाउंडेशन द्वारा समाजकार्याचे काम सुरू केले. आज जवळपास १५ वर्षापासून रुपेश टांगले हे या फाउंडेशन द्वारे गरजू लोकांना मदत करत आहेत. भंडारा शहरामध्ये ज्यावेळी पुर परिस्थिती निर्माण झाली होती, त्यावेळी सुध्दा रुपेश टांगले व त्यांच्या युनिव्हर्सल स्पोर्ट फाउंडेशनच्या माध्यमातून भंडारा, बेला, पिंडकेपार, गणेशपूर, दवडीपार या ठिकाणच्या लोकांना भोजनाची व्यवस्था व गरजू वस्तूंची मदत केली होती.

साहिल पंचबुध्दे राहणार भंडारा याची थायलंडमध्ये सिस्टो व्हॉलीबॉल/नेट वॉलीबॉल मध्ये निवड झालेली होती. पण त्याची आर्थिक परिस्थिती बरोबर नसल्यामुळे त्याला जाता येऊ शकत नव्हते. त्यानी मदतीसाठी खुप लोकांकडे धाव घेतली, मात्र त्यालाकोणीही मदत केली नाही, अखेर त्याने रुपेश टांगले यांच्याकडे मदतीसाठी धाव घेतली. यावेळी रुपेश टांगले यांनी आपल्या शहरातील मुलगा मागे पडू नये म्हणून लगेच लागेल तेवढी आर्थिक मदत करुन त्या मुलाचे गोल्ड मेडल पटकावण्याचे स्वप्न पूर्ण केले. रुपेश टांगले यांनी जर त्या मुलाला मदत केली नसती तर त्याचे स्वप्न स्वप्नच राहिले असते. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय समाजसेवक रुपेश टांगले व त्यांच्या फाउंडेशनला दिले. तसेच युनिव्हर्सल स्पोर्ट फाउंडेशन तर्फे युवावर्गाला चांगले मार्गदर्शन करण्याचे काम रुपेश टांगले करत असतात. आजच्या काळात ऐवढे सर्व करून सुध्दा कसल्याही प्रकारचा दिखावा न करता आजही ते कार्य करीत आहेत.त्यांनी सर्व गरजूंना मदत करुन समाजापुढे एक सामाजिक बांधिलकीचे चांगले उदाहरण दाखवून दिले. यामुळे रुपेश टांगले यांच्या कडून युवा व सामाजीक कार्यातील लोकांना शिकण्यासारखा आहे.

रुपेश टांगले यांनी युनिव्हर्सल स्पोर्ट फाउंडेशनच्या माध्यमातून बीपीएलचे सुरू केले

भंडारा शहर एवढा मोठा असून सुध्दा शहरामध्ये कसल्याच प्रकारचे खेळ होत नाही, हे दिसून येताच रुपेश टांगले यांनी युनिव्हर्सल स्पोर्ट फाउंडेशनच्या माध्यमातून सात ते आठ वर्षा पासून भंडारा प्रीमियम क्रिकेट आयपीएल बेसिक वर बीपीएल क्रिकेटचे सामने सुरू केले. ज्यामध्ये वेगवेगळ्या गावातील व शहरातील युवकांना खेळायची संधी प्राप्त झाली.

कोरोनाग्रस्तांना रूपेश टांगले यांच्या मार्फत आॅक्सिजन चा पुरवठा करण्यात आला

आपल्या सर्वांना माहितच आहे संपुर्ण महाराष्टÑावर कोरोना महामारीचे संकट आले होते, त्या काळात जर कोणला या बिमारीची लागवण झाली तर त्यांच्या घरचे सुध्दा जवळ येत नव्हते, अशा बिकट परिस्थितीमध्ये रुपेश टांगले व त्यांच्या युनिव्हर्सल स्पोर्ट फाउंडेशनच्या माध्यमातून भंडारा जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांना मोफत आॅक्सिजन पुरवठा करण्यात आला व परदेशातून आलेल्या लोकांना राहण्याची व खाण्याची सुविधा सुद्धा फाउंडेशन तर्फे करण्यात आली होती. कोविड काळात करचखेडा येथील स्मशानभूमीत संपूर्ण लाईटची व्यवस्था सुद्धा समाजसेवक रुपेश टांगले व त्यांच्या युनिव्हर्सल फाउंडेशन द्वारा करण्यात आली होती.

प्रफुल पटेल व रुपेश टांगले यांच्या सहकार्याने विविध खेळाडूंना संधी मिळाली

प्रफुल पटेल यांच्या सहकार्याने व रुपेश टांगले यांच्या मदतीने आकाश पिकलमुंडे यांना प्रो कबड्डी खेळण्याची संधी मिळाली व आकाश ने आज आपल्या मोहाडी तालुक्याचा व भंडारा शहराचा नाव मोठा केला आहे. तसेच इतर खेळांडूना सुद्धा संधी मिळवून देत आहेत. दरवर्षी प्रफुल पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त रुपेश टांगले व त्यांच्या युनिव्हर्सल स्पोर्ट फाउंडेशनच्या माध्यमातून रक्तदान शिबिर व विविध आरोग्य शिबिरांचे कार्यक्रम घेतले जाते. ज्यामध्ये दर वर्षी ८० ते ९० लोक रक्तदान करतात व या माध्यमातून रक्ताची गरज असणाºया लोकांना मोफत मदत केली जाते.

ईश्वर साखरकर, रजत ईश्वरकर या दोन खेळाडूंना टी-टेल लेदर बॉल चंदिगड येथे खेळायची संधी मिळत नव्हती त्यांनी रुपेश टांगले यांना मदत मागीतली व त्यांनी मदत सुध्दा केली. ज्यामुळे दोन्ही खेळाडूंना टी-टेल लेदर बॉल चंदिगड येथे खेळायची संधी मिळाली. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलन भंडारा येथे खेळायला येणाºया मुलांना हॉयमास लाईट नसल्यामुळे त्रास सहन करावा लागत होता, ही गोष्ट रुपेश टांगले यांच्या लक्षात येताच त्यांनी मदतीचा हात समोर करत, मुलांना कसल्याही प्रकारच्या त्रास होणार नाही याची दक्षता घेतली व ९ मीटर हॉयमास लाईटची व्यवस्था स्वखर्चाने करून दिली.

 

 

 

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *