भारतीय सामाजिक परिवर्तन प्रक्रियेचा अग्रदूत डॉ.बाबासाहेब आंबेडकर – प्राचार्य डॉ. दिगांबर कापसे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखनी : स्थानिक राष्ट्रीय शिक्षण संस्था द्वारा संचालित समर्थ महाविद्यालय लाखनी येथे आज दिनांक ६ डिसेंबर २०२३ रोज बुधवारला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दिगांबर कापसे उपस्थित होते. भारतात प्राचीन काळापासून असलेली सामाजिक व्यवस्था कौशल्य पूर्वक बदलून भारतात आदर्श अशी सामाजिक क्रांती घडविण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले म्हणून ते भारतीय सामाजिक परिवर्तन क्रांतीचे जनक सोबतच अग्रदूत ठरतात असे विचार प्राचार्य डॉ. दिगांबर कापसे यांनी प्रतिपादित केले ते ” महापारीनिर्वान ” दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी बोलत होते . जगात अनेक राजकीय व सामाजिक क्रांती घडून आल्या मात्र दीर्घ व कोट्यावधी अनुयायी मिळवणारी व सफल अशी क्रांती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घडवून आणली म्हणून ते ‘महामानव’ ठरतात.

समर्थ महाविद्यालयात ‘आपले विद्यार्थी आपले वक्ते’ या अंतर्गत महापरिनिर्वाण दिनाचे आयोजन सास्कृतिक विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, छात्रसेना यांच्या वतीने करण्यात आले होते. व्यासपीठावर रासेयो अधिकारी प्रा. धनंजय गिºर्हेपुंजे, छात्रसेना प्रमुख कॅप्टन प्रा. बी. के. रामटेके, प्रा. अशोक गायधनी डॉ.ध.रा. गभने उपस्थित होते. कु रागिणी कामथे, विनय रोकडे, कु.रुकय्या बकाली,राजश्री तेम्भरे, तोषाली मेश्राम, प्राची सोनटक्के, तृप्ती बनसोड, पौर्णिमा टेंभुर्णी, आकांक्षा नागदेवे यांनी याप्रसंगी आपले विचार मांडले. या सर्व सहभागी विद्यार्थ्यांना पाहुण्याच्या हस्ते प्रशस्ती पत्र देण्यात येऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.बंडू चौधरी संचालन प्रा. युवराज जांभूळकर, आभार प्रा. रुपाली कावळे यांनी मानले कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी व प्राध्यापक, शिक्षकेतर वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमा करिता डॉ संगीता हाडगे, डॉ बंडू चौधरी, प्रा अजिंक्य भांडारकर यांनी परिश्रम केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *