मुलींना व महिलांना सक्षमपणे जीवन जगण्यासाठी अवांतर वाचनाची गरज : पुनम राऊत पाटील

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : समाजामध्ये महीला व मुलींना अनेक सामाजिक, आर्थिक, राजकीय, आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत असुन त्यांना कुणाची तरी आधाराची गरज असते, त्याचं बरोबर त्यांनी शिक्षणाची कास धरून अवांतर वाचनाची आवड निर्माण केली तर त्यांच्या प्रश्नाची उत्तरत्यांना मिळतील, त्यासाठी मुली व महिलांना अवांतर वाचनाची गरज आहे असे मत मोहरना येथे आयोजित महीला सक्षमीकरण कार्यशाळेला मार्गदर्शक म्हणून मालेगांव, जि.नाशिक येथिल सहाय्यक पोलिस निरीक्षक पुनम राऊत पाटिल यांनी व्यक्त केले. यावेळी अध्यक्ष म्हणून जी. प. सदस्या विशाखाताई माटे, उमेद अभियानचे योगेश चुटे, पंचायत समिती सदस्य मंगेश राऊत, मोहरणा ग्राम पंचायतचे सरपंच प्रभाकर मेंढे, परमेश्र्वर पिल्लेवान, कमलदाश रामटेके, दादाजी राऊत, श्रीधर राऊत, प्रभाकर चौधरी, बबन नागोसे, हीरोक बगमारे, देवदास देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यशाळेला गावातील मोठ्या संख्येने मुली व महीला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस पाटील सुभाष राऊत, संचालन भोजराज पीलारे तर आभार प्रदर्शन पं. स.सदस्य मंगेश राऊत यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी उमेद अभियान अंतर्गत महीला बचत गटातील आय.सी.आर.एफ. वैभवी बोरकर, प्रांजली भानरकर, मधुमाला तमगाडगे, मेघा बोरकर, साजन वकेकार, रीना चौधरी, त्रिशिला उके आदी दारू बंदी महीला मंडळ, ग्रामपंचायत कार्यालय मोहरना, तंटामुक्त गाव समिती यांनी मोलाचे सहकार्य केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *